पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित दीपोत्सवाने झगमगली एरंडोल नागरी. प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी एरंडोल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित दीपोत्सवाने झगमगली एरंडोल नागरी.
प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी एरंडोल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल-शहरात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणा-या पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे पाडव्यानिमित्त दीपोत्सव कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हजारो दिवे लाऊन आकर्षक सजावट करण्यात आली होती. शहरात पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने अनेक वर्षांपासून विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.यावर्षी दीपावली पाडव्यानिमित्त पांडववाड्यासमोर असलेल्या हनुमान मंदिरासमोर पटांगणावर दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीरामांच्या मूर्तीसमोर हजारो दिवे लावून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन, माजी उपनगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर, डॉ.गितांजली ठाकूर, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर काबरा, सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी, अमोल तांबोळी यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी दिलेल्या विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
दिपोत्सावानिमित्त आयोजित कार्यक्रमात हजारो महिला स्वयंस्फुर्तीने सहभागी झाल्या होत्या. पटांगणावर लावण्यात आलेल्या दिव्यांमुळे सर्व परिसर प्रकाशमय झाला होता. फटाक्यांच्या आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी, गोपालकाळा, महाशिवरात्री, गणेशोत्सव आरास स्पर्धा यासह विविध धारामिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नथ्थूबापू यांना हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भगवी चादर चढवण्यात येते. भगवी चादर मिरवणूक शहराचे विशेष आकर्षण ठरत असते. पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेचे कुणाल महाजन, भोला पवार, मयूर बिर्ला, तुषार सोनार, मुन्ना साळी, भावेश तिवारी, नितीन बोरसे, पवन साळी, केवल ठक्कर, उमेश साळी, बलदेव परदेशी, कल्पेश शिंपी, वैभव पाटील, रोहिदास महाजन, भुरा पाटील, राजेश शिंपी, मयूर महाजन, मुन्ना महाले, गणेश वाणी, बजरंग वाणी, सागर महाजन, प्रसन्न परदेशी, सत्यं परदेशी, तेजस बिर्ला, तनय बिर्ला, कृष्णा बिर्ला, राकेश लढे, प्रवाराज पाटील, भूषण चौधरी यांचेसह पदाधिका-यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.कार्यक्रमास हजारो नागरिक उपस्थित होते. उपस्थितांमध्ये महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.


No comments