धुपेश्वर मंदिर परिसरात चाकू हल्ला : एका तरुणाचा मृत्यू, दोन जखमी — किरकोळ वादातून रक्तरंजित संघर्ष अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमक...
धुपेश्वर मंदिर परिसरात चाकू हल्ला : एका तरुणाचा मृत्यू, दोन जखमी — किरकोळ वादातून रक्तरंजित संघर्ष
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर (दि९) -:- तालुक्यातील हरसोडा ग्रामपंचायत हद्दीतील धुपेश्वर मंदिराजवळ मंगळवारी (दि. ८ ऑक्टोबर) संध्याकाळी घडलेल्या भीषण हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या या वादाने जीवघेणे स्वरूप घेतले असून पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध खुनासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्यात अप. क्र. 138/2025, कलम 103(1), 109, 118(1), 189(2)(4), 190, 191(1)(3) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सूरज सुनिल झाल्टे (वय 21, रा. चित्राळा, ता. मुक्ताईनगर, जि. भडगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेत मृत्यू झालेला तरुण म्हणजे सतिश गजानन झाल्टे (वय 21, रा. पिंप्राळा, ता. मुक्ताईनगर) असून जखमींमध्ये अविनाश जितेंद्र झाल्टे आणि फिर्यादी सूरज झाल्टे यांचा समावेश आहे.
🔹 घटना कशी घडली
फिर्यादी सूरज झाल्टे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे,
८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ५.५१ वाजता सूरज धुपेश्वर पूलाजवळ असताना त्याचा मित्र अविनाश झाल्टे याचा फोन आला. अविनाशने सांगितले की मलकापूरकडून येताना झोडगा गावाजवळील वळणावर कट मारल्याच्या कारणावरून काही युवकांनी त्याला मोटरसायकलवरून खाली उतरवून चापटांनी मारहाण केली आहे, आणि ती मंडळी त्याच्या मागे येत आहेत.
सूरज झाल्टे व त्याचे साथीदार सतिश झाल्टे, मनोहर झाल्टे, आदित्य झाल्टे, दिशांत भोलनकर हे सर्वजण तातडीने धुपेश्वर मंदिराकडे धावले. तेथे पोहोचल्यावर मंदीरासमोर आठ ते नऊ युवक उभे होते. अविनाशने दाखवून दिले की हेच त्याला आधी मारहाण करणारे आहेत. एवढ्यात त्या युवकांनी पुन्हा त्याच्यावर हल्ला केला.
हल्ल्यादरम्यान आरोपींपैकी साहिल सुधाकर पालवे याने अविनाशच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर सतिश झाल्टे हे मध्यस्थी करण्यास गेले असता, आरोपी संकेत सुनील उन्हाळे याने सतिशच्या पोटावर, हातावर आणि डोक्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. सूरज झाल्टे यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हातावरही वार झाला. रक्तबंबाळ अवस्थेत सतिश घटनास्थळी कोसळला. ते पाहून आरोपींपैकी काही पळून गेले, तर काहींना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
जखमींना रुग्णालयात हलविणे
घटनेनंतर अविनाश झाल्टे याला नातवाइकांनी कु-हा येथील दवाखान्यात दाखल केले, तर सतिश झाल्टे याला मलकापूर येथील दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. फिर्यादी सूरज झाल्टे हेही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे :
1️⃣ साहिल सुधाकर पालवे, रा. गोपालकृष्ण नगर, मलकापूर
2️⃣ देवसिंग तिलकसिंग ठाकुर, रा. रामवाडी, मलकापूर
3️⃣ संकेत सुनील उन्हाळे, रा. गोपालकृष्ण नगर, मलकापूर
4️⃣ अरविंद उर्फ गव्या अजय मोळचे, रा. लक्ष्मीनगर, मलकापूर
5️⃣ आदित्य वानखेडे, रा. मंगलमेट, मलकापूर
6️⃣ रुशी रामलाल इंगळे, रा. माता महाकाली नगर, मलकापूर
7️⃣ हर्षल घोंगटे, रा. आबा ता. मोताळा
8️⃣ गणेश वायडे, रा. सातव प्लॉट, मलकापूर
9️⃣ कौशल घाटे, रा. गाडेगाव मंदिरजवळ, मलकापूर त्यापैकी काही आरोपींना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिस तपास
घटनेचा दाखल अधिकारी पोहेका दिलीप चव्हाण (ब.न. 936, मो. 9834124546) असून तपासाची जबाबदारी सपोनी हेमराज कोळी (मो. 9930630111) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
परिसरात तणावाचे वातावरण :- या खूनप्रकरणानंतर हरसोडा, धुपेश्वर व परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.




No comments