राष्ट्रवादी युवतीच्या यावल तालुकाध्यक्षपदी कु.धनश्री कमलाकर देशमुख भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : समाजामध...
राष्ट्रवादी युवतीच्या यावल तालुकाध्यक्षपदी कु.धनश्री कमलाकर देशमुख
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : समाजामध्ये युवतींना त्यांच्या हक्क आणि अधिकाराची जाणीव व्हावी,सजगता व धैर्य त्यांच्यामध्ये यावे,शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचाव्यात तसेच योजनांचे त्यांनी दूत व्हावेत या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटना काम करते. पक्षाचे हेच ध्येयधोरण सामान्यांपर्यंत पोहचवण्यात यावे म्हणून यावल तालुका अध्यक्ष पदावर कु.धनश्री कमलाकर देशमुख यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अँड.संध्याताई सोनवणे व पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या संमतीने युवती जिल्हाध्यक्षा भाग्यश्री विवेक ठाकरे यांनी धनश्री कमलाकर देशमुख यांना नियुक्तीपत्र दिले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे,ज्येष्ठ नेते भगतसिंग पाटील, माजी नगरसेवक कदीर खान, उत्तर महाराष्ट्र युवती विभागीय अध्यक्ष अभिलाषाताई रोकडे, जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील,तालुकाध्यक्ष रितेश पाटील, शहराध्यक्ष राजेश करांडे,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, शहाराध्यक्ष योगेश पाटील व विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.
प्रतिक्रिया :
यावल तालुक्यात सर्व समाजाच्या युवतींना पक्षाच्या झेंड्याखाली आणण्याचे काम करणार असून शिव,शाहू,फुले आणि आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारधारेवर आधारित काम युवती व महिलांना सोबत घेऊन केले जाईल.
धनश्री कमलाकर देशमुख
नवनियुक्त तालुकाध्यक्षा,
राष्ट्रवादी युवती काँग्रेस यावल

No comments