महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र मंडळ, यावल तालुकाध्यक्षपदी अशोक तायडे तर शहराध्यक्षपदी ऋषिकेश (तात्या) कोळी यांची निवड भरत कोळी यावल ता. प्रति...
महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र मंडळ, यावल तालुकाध्यक्षपदी अशोक तायडे तर शहराध्यक्षपदी ऋषिकेश (तात्या) कोळी यांची निवड
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथे महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र मंडळाची बैठक तारकेश्वर मंदिरात उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत यावल तालुका अध्यक्षपदी अशोक तायडे (डोंगर कोठारा) तर यावल शहराध्यक्षपदी ऋषिकेश उर्फ तात्या कोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी मंडळाच्या विविध पदांवर पुढील निवडी करण्यात आल्या:
उपतालुकाध्यक्ष: सागर कोळी (यावल)
सचिव: गौरव तायडे (हिंगोणा)
कार्याध्यक्ष: गणेश पाटील (चितोडा)
सहसंघटक: हेमंत फेगडे (यावल)
सल्लागार: ऍड. अशोक चौधरी (फैजपूर)
युवा संघटक: रुपेश कोळी (यावल)
संपर्क प्रमुख: पत्रकार शब्बीर खान (हिंगोणा)
सह संपर्क प्रमुख: युनूस तडवी (म्हैसवाडी)
महिला अध्यक्ष: सौ. लक्ष्मी मेढे (मारूळ)
प्रसिद्धी प्रमुख: गोकुळ कोळी
बैठकीच्या शेवटी नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फुलांच्या पुष्पगुच्छाने अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावांतील कार्यकर्ते, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments