पीक कापणी प्रयोगात. मापात पाप होऊ नये---- किशोर पाटील जिल्हाध्यक्ष शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना जळगाव विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेम...
पीक कापणी प्रयोगात. मापात पाप होऊ नये---- किशोर पाटील जिल्हाध्यक्ष शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना जळगाव
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पारोळा : भारतात यावर्षी शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेत पीक कापणी प्रयोग व उंबरठा उत्पन्न यावर आधारित शेतकऱ्यांच्या पिकाच्या अंतिम अहवालावर पिक विमा मिळणार असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
पीक कापणी प्रयोगात विदर्भात चुकीचा बेकायदेशीर वजन काटा वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना पिकनुकसान होऊन सुद्धा पिक विमा मिळू नये म्हणून जाणून-बुजून प्रयत्न केल्याचे निष्पन्न झालेले असून या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसान होऊन सुद्धा महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे.
उंबरठा उत्पन्न व पीक कापणी प्रयोग पिक विमा कंपनी व शासनाला अहवाल सादर करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो या प्रयोगाच्या वेळी गावातील दोन प्रगत शेतकरी ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक मंडळ अधिकारी व शासकीय कर्मचारी यांच्या समवेत पीक कापणी प्रयोग केला जातो हंगामात सरासरी उत्पन्न ठरवण्यासाठी एका महसूल मंडळात एका पिकाचे बारा पीक कापणी प्रयोग होतात. रँडम पद्धतीने सहा गावात हा पीक कापणी प्रयोग केला जातो प्रत्येक गावात दोन ठिकाणी असे बारा पीक कापणी प्रयोग घेतले जातात या ठिकाणी प्रति हेक्टर किती सरासरी उंबरठा उत्पन्न आले त्यानुसार क्रॉप कटिंग एक्सपिरिमेंट या केंद्र शासनाच्या विभागाला शासनाची आकडेवारी ठरवण्यासाठी हा डाटा केंद्र सरकारला व पिक विमा कंपनींना पाठवला जातो
पिक विमा कंपनीकडून केंद्र सरकार व राज्य सरकार व विमा कंपनीकडून ही योजना राबवली जात असताना उंबरठा उत्पन्न व पीक कापणी प्रयोगाचा अंतिम अहवाल ठरवून उत्पन्नाचे आकडेवारी व पैसेवारी यानुसार पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत असतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा जागरूक असणे महत्त्वाचे असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहून पीक कापणी प्रयोग व उंबरठा उत्पन्न व पैसे आणेवारी याकडे लक्ष असू देणे महत्त्वाचे आहे असे आवाहन शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांनी केले आहे

No comments