adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सुनंदन बहुउद्देशीय संस्थेच्या "दिवाळी पहाड" उपक्रमातून आदिवासी बांधवांसोबत हरित आणि आनंदमयी दिवाळी साजरी

 🏮 सुनंदन बहुउद्देशीय संस्थेच्या "दिवाळी पहाड" उपक्रमातून आदिवासी बांधवांसोबत हरित आणि आनंदमयी दिवाळी साजरी🪔 🪔  प्रतिनिधी जळगाव...

 🏮 सुनंदन बहुउद्देशीय संस्थेच्या "दिवाळी पहाड" उपक्रमातून आदिवासी बांधवांसोबत हरित आणि आनंदमयी दिवाळी साजरी🪔🪔 


प्रतिनिधी जळगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या खैरखुंडी पाड्यावर सुनंदन बहुउद्देशीय संस्था तर्फे आयोजित “दिवाळी पहाड – खैरखुंडी पाडा २०२५” हा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.  या उपक्रमाचे उद्दिष्ट आदिवासी भागात दिवाळीचा आनंद आणि प्रकाश पोहोचविणे तसेच समाजात हरित दिवाळी व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे हे होते.

 कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.

या कार्यक्रमाला वनविभाग चोपडा (देवझिरी कार्यालय) येथील वनरक्षक स्वप्निल रणदिवे साहेब यांनी विशेष उपस्थिती लावली. तसेच   गावपटेल सुनील बारेला व आशा सेविका द्वारकाबाई पावरा हजर होते. यावेळी सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले मान्यवराचे प्राथमिक स्वागत संस्थेच्या सहकाऱ्यांनी केले. तद्नंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र सोनवणे यांनी केले.  या कार्यक्रमाला मार्गदर्शन रणदिवे साहेब यांनी  हरित दिवाळी आणि पर्यावरण संवर्धन याविषयी मार्गदर्शन करून सर्वांना पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे आवाहन केले.

 “एक दिवा – एक आनंद” या उपक्रमातून सहभागी नागरिकांना दिवे,फराळ,कपडे व शालेय साहित्य, यांचे वाटप केले. तसेच संस्थेचे सहकारी राजू बारेला यांनी आपल्या स्थानिक भाषेत आरोग्य व शिक्षण जनजागृती चा संदेश दिला.

 कार्यक्रमाचा समारोप रोहन सोनवणे यांनी आभार प्रदर्शन करून केले. यावेळी संस्थेचे कृष्णा सोनवणे,राजीव चौधरी, सचिन बाविस्कर,निशांत कोळी, सुरज शिरसाठ, ईश्वर सोनवणे, कृष्णा बोरसे, प्रथमेश सनेर, कृष्णा शार्दुल, पिरन बारेला, दिपक सोनवणे उपस्थित होते. हा कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी, गावकरी व या कार्यक्रमाला सढळ हाताने मदत करणारे दाते यांनी विशेष सहकार्य केले.

No comments