मजरेहोळ येथील बहीण भाऊंचे जागतीक ठिकाणी यश. अमेरिकेत घेतोय शिक्षण चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- तालुक्यातील मजरेहो...
मजरेहोळ येथील बहीण भाऊंचे जागतीक ठिकाणी यश. अमेरिकेत घेतोय शिक्षण
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- तालुक्यातील मजरेहोळ या छोट्याशा गावातील पोलीस खात्यातील सुनील मराठे यांचा मुलगा सागर मराठे यांनी जागतिक पातळीवरील सीएफए या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात हजारो विद्यार्थ्यांमध्ये प्राविण्य मिळवले असून या परीक्षेसाठी त्याने अतिशय मेहनत घेऊन यश संपादन केले आहे.
त्याच बरोबर सागर ची बहीण ही सुद्धा बीएएलबी करून एलएलएम ची परीक्षा दिल्ली येथून सिल्व्हर मेडल मिळवून पास झाली असून ती सद्ध्या मुंबई येथे हायकोर्टात वकील म्हणून कार्यरत असून लवकरच ती जज म्हणून नियुक्त होणार आहे.
दोघा बहीण भाऊंच्या या यश्यामागे वडील सुनील मराठे व आई सुरेखा मराठे यांचा खूप मोलाचा वाटा असून पोलीस खात्यात काम करणारे सुनील मराठे यांनी दोघांना अतिउच्च शिक्षण देऊन घडविले.त्याबद्दल सागर व स्वेता यांचे सर्वच कौतुक व अभिनंदन करीत आहेत.छोट्याशा गावातील मराठे कुटुंबातील मुलं आज आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करून गावाचे नाव मोठे करताय त्याबद्दल साई संस्थान मजरेहोळ ट्रस्टचे व्यवस्थापक दिलीप भिवसन मराठे,हरी भिवसन मराठे,प्रल्हाद भिवसन मराठे,उत्तम भिवसन मराठे यांनी व गावातील जेष्ठ श्रेष्ठ नागरीक व विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांनी ही अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments