_जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना 'हिंदु जनजागृती समिती'चे निवेदन!_ हिवाळी अधिवेशनात 'लव जिहाद' विरोधी कायदा लागू करा ! भर...
_जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना 'हिंदु जनजागृती समिती'चे निवेदन!_
हिवाळी अधिवेशनात 'लव जिहाद' विरोधी कायदा लागू करा !
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल :- राज्याचे जलसंपदा मंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय श्री. गिरीश भाऊ महाजन यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा राज्याच्या आगामी हिवाळी अधिवेशनात त्वरित लागू करण्यात यावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले. ते यावल तालुक्यातील आसराबारी या आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी करण्यासाठी आले असता समितीच्या वतीने श्री. धीरज भोळे यांनी हे निवेदन दिले.
या निवेदनामध्ये, महाराष्ट्रात 'लव जिहाद'च्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करण्यात आली असून, महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी हा कायदा तातडीने अंमलात आणण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या देशात 11 राज्यात यावर कायदा असून आता महाराष्ट्रातही हा कायदा लागू करून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मजबूत पाऊल शासनाने उचलावे अशी अपेक्षा यातून व्यक्त केली. मंत्री महाजन यांनी या मागणीची दखल घेतली असून, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. 'हिंदु जनजागृती समिती'ने हा कायदा लवकरात लवकर लागू व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे.

No comments