मातंग तरुण संजय वैरागर प्रकरणी आरोपींवर मोक्का लावा वंचितचे राज्य महासचिव प्रा.किसन चव्हाण यांची ठाम मागणी... अहिल्यानगर जिल्हा ‘दलित-अत्य...
मातंग तरुण संजय वैरागर प्रकरणी आरोपींवर मोक्का लावा वंचितचे राज्य महासचिव प्रा.किसन चव्हाण यांची ठाम मागणी...अहिल्यानगर जिल्हा ‘दलित-अत्याचारग्रस्त’ घोषित करा..वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर लवकरच जिल्हा दौरा करणार..!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२३) – नेवासा तालुक्यातील सोनई येथे मातंग समाजातील तरुण संजय वैरागर याच्यावर हिंदुत्ववादी काही गावगुंडांनी केलेल्या अमानुष मारहाणीने जिल्हा हादरला आहे. या घटनेत वैरागर यांचे हात-पाय तोडण्यात आले, डोळा फोडण्यात आला, तसेच त्यांच्या अंगावर लघुशंका करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा.किसन चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी संजय वैरागर यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले “हा केवळ मारहाणीचा नव्हे तर जाती अत्याचाराचा प्रकार आहे. आरोपींवर तात्काळ मोका कायद्यानुसार कारवाई करावी आणि अहिल्यानगर जिल्हा ‘दलित-अत्याचारग्रस्त जिल्हा’ म्हणून घोषित करावा.”
प्रा. चव्हाण यांनी पुढे सांगितले की, “दलितांवर होणाऱ्या अत्याचारांना राज्य सरकार गंभीरतेने घेत नाही. जातीय द्वेषातून केलेल्या या अमानुष हल्ल्यातील आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.”या भेटीप्रसंगी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष चोळके, नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव, शहर महासचिव प्रवीण ओरे, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे, तसेच संकेत शिंदे, रियाज शेख, विवेक कसबे, मनोज साळवे, सुरेश पानपाटील, शरीफ पठाण, प्रतीक जाधव, प्रतीक ठोकळ, फैरोज पठाण, भारतीय बौद्ध महासभेचे गोरख केदारे, संतोष जाधव, नितीन साळवे, अविनाश राक्षे, सचिन कांबळे, सार्थक आढाव, संजय शिंदे, पिनू भोसले, कुमार बनसोडे, दिनेश पाखरे, अजय पाखरे, श्रीकांत देठे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर लवकरच अहिल्यानगर जिल्ह्याला भेट देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

No comments