adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिवाळी निमित्त सामाजिक बांधिलकीचा सुंदर उपक्रम

 प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिवाळी निमित्त सामाजिक बांधिलकीचा सुंदर उपक्रम   मलकापूर  प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) प्रहार जनशक्ती पक...

 प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिवाळी निमित्त सामाजिक बांधिलकीचा सुंदर उपक्रम  


मलकापूर  प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री मा. बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या “सेवा हाच धर्म” या विचारधारेतून प्रेरित होत मलकापूर शहरात दिवाळी निमित्त एक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. आज दुपारी १२:०० वाजता मलकापूर शहरातील रेल्वे परिसर व कॉटन मार्केट परिसरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गरजू आणि वंचित घटकांमध्ये शेव-चिवडा व मिठाईचे वाटप करण्यात आले. दिवाळी सणाचा आनंद सर्वांसोबत वाटण्याच्या हेतूने हा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.


या उपक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा प्रमुख वैभवराजे मोहिते आणि प्रहार नेते गजानन लोखंडकर यांनी केले. त्यांच्या प्रेरणेतून मलकापूर शहर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन दिवाळीच्या निमित्ताने गरजूंपर्यंत आनंदाचा किरण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे नेतृत्व उपजिल्हा प्रमुख अजय टप यांनी केले. या वेळी जिल्हा उपप्रमुख अजय टप, शहर प्रमुख शालिग्राम पाटील, शहर उपप्रमुख बळीराम बावस्कर, उमेश जाधव, शहर युवा अध्यक्ष करण नायसे, तसेच पत्रकार अनिल गोठी, करण झनके आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. रेल्वे परिसर व कॉटन मार्केटमधील अनेक गरजू नागरिकांनी आनंदाने मिठाई आणि शेव-चिवडा स्वीकारला. या उपक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी वृद्ध, मजूर, तसेच रस्त्यावर दिवाळी साजरी करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. 


No comments