शिरपूर शहरातील अवैध गुटखा त्वरित बंद करण्याची मागणी मानव विकास पत्रकार संघातर्फे देण्यात आले निवेदन शिरपूर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
शिरपूर शहरातील अवैध गुटखा त्वरित बंद करण्याची मागणी
मानव विकास पत्रकार संघातर्फे देण्यात आले निवेदन
शिरपूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मा. मुख्याधिकारी सो. शिरपूर वरवाडे नगरपरिषद, शिरपूर, ता. शिरपूर, जि. धुळे. यांना मानव विकास पत्रकार संघातर्फे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिरपूर शहरात अवैध्य रित्या तंबाखूजन्य गुटखा सुगंधी तंबाखू,सुपारी व तत्सम गुटखा बेकायदेशीर रित्या विक्री होत असून गुटखामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शिरपूर शहरात राजरोसपणे बस स्टैंड परिसर, निमझरी नाका ते करवंद नाका तसेच शाळा, कॉलेज परिसरात व दवाखाने यांच्या परिसरात, कोर्ट-कचेरी व शासकीय कार्यालयाच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू असून तंबाखूजन्य गुटखामुळे अनेक तरुण व्यसनाधीन होऊन कॅन्सरसारख्या असाध्य रोगांनी ग्रस्त होत आहेत. सदरील गुटखा विक्री करणारे हे बेकायदेशीर रित्या मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करीत असून त्यांच्यावर कायद्याचा धाक राहिला नाही. शासनाचे स्वच्छ शहर व तंबाखूमुक्त अभियान योजनेचा बोजवारा उडत असून सदरील बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी. शिरपूर शहरात मोठ्या प्रमाणात असलेला तंबाखूजन्य गुटखा साठ्याची देखील चौकशी होणे गरजेची आहे. तरी शहरातील अवैद्यरित्या विक्री करणारे गुटखा विक्रेत्यांवर कडक उपाययोजना करण्यात येऊन कायदेशीर कारवाई व्हावी व शिरपूर शहर गुटखामुक्त करण्यात यावे म्हणून हे निवेदन आहे.सदरील निवेदनाची दखल घ्यावी. निवेदनाची दखल न घेतली गेल्यास मानव विकास पत्रकार संघातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे कळवले असुन निवेदन देतेवेळी डॉ. प्रदीप पवार संस्थापक अध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ संपादक मानव आयोग वृत्तपत्र,वसीम खाटीक प्रदेशाध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ संपादक खानदेशी लीडर वृत्तपत्र,बी.व्ही.गिरासे विभागीय सचिव,पंडित निकम विभागीय उपाध्यक्ष,रोशनसिंग झाल्टे जिल्हाध्यक्ष धुळे,ज्ञानेश्वर पावरा जिल्हा सचिव धुळे,इमरान पठाण अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष धुळे,कैलास राजपूत तालुकाध्यक्ष,राधेश्याम पावरा शिरपूर तालुका उपाध्यक्ष,दिलीप पाटील जिल्हा उपाध्यक्ष धुळे,भटु धनगर शिरपूर शहरध्यक्ष,संतोष चौधरी सदस्य,अरुण कांबळे सदस्य,जंदलाल बडगुजर सदस्य शिरपूर,साबीर मनेर सदस्य शिरपूर,बिस्मिल्ला शहा सदस्य शिरपूर,श्याम चांदे सदस्य शिरपूर,एकनाथ वाघ सल्लागार मानव विकास पत्रकार संघ,जितेंद्र देवरे सदस्य,प्रमोद राठोड सदस्य बबळाज,मनोहर वाघ शिरपूर,अशपाक मिर्झा सदस्य शिरपूर,प्रदीप पाटील सदस्य,दिनेश शंभू कोळी अंतर्ली,बळीराम बंजारा बबळाज,मुकेश पावरा सदस्य भोईटी, मोतीराम पावरा सदस्य भोईटी,पत्रकार शेख इमरान शेख रफीक शिरपूर,संपादक सुनील सुर्यवंशी शिरपूर,दिलीप पाटील ताजपुरी.व मानव विकास पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे

No comments