adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भुसावळ-जळगावला जाण्याची गरज नाही! यावलमध्येच उपलब्ध सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू

  भुसावळ-जळगावला जाण्याची गरज नाही! यावलमध्येच उपलब्ध सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू  भरत यावल ता. प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल ताल...

  भुसावळ-जळगावला जाण्याची गरज नाही! यावलमध्येच उपलब्ध सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू 


भरत यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील नागरिकांना टीव्ही, फ्रिज, मोबाईल, वॉशिंग मशीन आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी आता भुसावळ किंवा जळगावला जाण्याची गरज उरलेली नाही. कारण यावल शहरातच “यश एजन्सी” या नावाने एक भव्य व आधुनिक शोरूम सुरू करण्यात आले आहे. या शोरूमचे व्यवस्थापक सतीश बडगुजर यांनी ग्राहकांना टीव्ही, एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, चैनीच्या तसेच घरगुती उपयोगी वस्तू योग्य दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी खास लकी ड्रॉ योजना राबविण्यात आली असून, ठराविक वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जात आहेत. यावल येथील शेतकी संघाच्या परिसरात सुरू असलेल्या यश एजन्सीमध्ये सध्या ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. एजन्सीतील सर्व कर्मचारी ग्राहकांशी नम्रतेने वागून योग्य मार्गदर्शन करत आहेत. “ग्राहकांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा आणि एकदा तरी यश एजन्सीला भेट द्यावी,” असे आवाहन व्यवस्थापक सतीश बडगुजर यांनी केले आहे. 


No comments