चोपडा काँग्रेस पक्ष, आदिवासी सेवा मंडळ चोपडा व शरद्चंद्रिका आक्का नागरी पतसंस्था चोपडा च्या वतीने अँड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील यांच्य...
चोपडा काँग्रेस पक्ष, आदिवासी सेवा मंडळ चोपडा व शरद्चंद्रिका आक्का नागरी पतसंस्था चोपडा च्या वतीने अँड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते पूरग्रस्तांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तहसीलदारांमार्फत मदत
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी आदिवासी सेवा मंडळ चोपडा,शरद्चंद्रिका आक्का नागरी पतसंस्था चोपडा व चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने यावर्षी झालेल्या अतिशय भयानक अतिवृष्टीमुळे मराठवाडा,विदर्भासह जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झालेली होती,शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून गेलेला आहे शेती,पशुधन व पिकांचे अतोनात नुकसान झालेले असुन ही बाब अतिशय गंभीर आहे अशावेळी राजकारण विसरून सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत शरद्चंद्रिका आक्का पतसंस्थेच्या वतीने रु.पंचवीस हजार,आदिवासी सेवा मंडळ चोपडा च्या वतीने रू.पंचवीस हजार व चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रू.अकरा हजार निधी धनादेशाद्वारे तहसीलदारां कडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय भैय्यासाहेब अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते सुपूर्द करण्यात आला, यावेळी माजी तालुकाध्यक्ष श्री.सुरेशबापु पाटील,तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक नंदकिशोर सांगोरे,माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील,चोसाकाचे व्हाईस चेअरमन शिवाजी अभिमन देसले,चोसाकाचे माजी व्हाईस चेअरमन गोपाल नवल धनगर,शेतकी संघाचे ल्हाईस प्रेसिडेंट बाळकृष्ण शंकरराव सोनवणे,चोसाका संचालक शरद धनगर,शेतकी संघ संचालक देविदास धनगर सूतगिरणी संचालक सुनील बागुले,वजाहत काझी, समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील,पंचायत समितीचे माजी उपसभापती देवानंद शिंदे,किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे,अल्पसंख्यांक अध्यक्ष जहीरभाई शेख,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आरिफ सिद्दिकी,छन्नु नाना पाटील,विकास जनकराव पाटील,मोहन देवराम पाटील,अशोक लिलाचंद पाटील,किशोर पाटील नंदलाल शिंदे,प्रवीण पाटील,मासूम दादा तडवी,महारु सरदार तडवी,गुलाब दादा बारेला,अशोक नारायण पाटील,दिपक दादा चौधरी, अविनाश पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments