adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

" बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व चोपडा तालुक्याची पैसेवारी ५०पैश्याचे आत लावली पाहिजे ......शेतकरी कृती समिती ची मागणी.

 " बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व चोपडा तालुक्याची पैसेवारी ५०पैश्याचे आत लावली पाहिजे ......शेतकरी कृती समिती ची मागणी.  विश...

 " बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व चोपडा तालुक्याची पैसेवारी ५०पैश्याचे आत लावली पाहिजे ......शेतकरी कृती समिती ची मागणी. 


विश्राम तेले चौगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बच्चू कडू यांच्या आंदोलनाची शासनाने लवकर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ जाहीर करावी.  शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्यासोबत तालुक्यातील कापूस,मका,बाजरी  साऱ्या पिकांच्या उत्पादनाची माहिती दिली व चोपडा तालुक्याची पैसेवारी ५० पैश्याच्या आत लावली पाहिजे अशी मागणी केली.असे निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना शेतकरी कृती समितीच्या वतीने देण्यात आले. तसेच नागपूर येथील आंदोलन जर लांबले तर आंदोलनात सहभागी आहेत त्या साथीदारांना अन्नधान्याची गरज पडेल,तशी मदत पाठवण्यासंदर्भात देखील नियोजन चोपडा तालुक्यातील शेतकरी करत आहेत असे कृती समिती च्या वतीने जाहीर करण्यात आले.

    त्यावेळी एस बी पाटील,प्रशांत पाटील,नारायण पाटील, अमृतराव वाघ, समाधान पाटील, अजित पाटील, धनंजय पाटील, गोकुळ चव्हाण, चंद्रकांत पाटील, शरद पाटील, भगवान पाटील, सुभाष पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी हजर होते.

No comments