adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नोव्हेंबरमध्ये जनगणनेची पूर्वचाचणी – चोपडा शहरातील नागरिकांनी स्वगणनेत सहकार्य करावे !

 नोव्हेंबरमध्ये जनगणनेची पूर्वचाचणी – चोपडा शहरातील नागरिकांनी स्वगणनेत सहकार्य करावे !  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा,...

 नोव्हेंबरमध्ये जनगणनेची पूर्वचाचणी – चोपडा शहरातील नागरिकांनी स्वगणनेत सहकार्य करावे ! 



चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा, ता. २९ :भारत सरकारने जनगणना २०२७ ची तयारी म्हणून देशभर पूर्वचाचणी (Pre-Test) सुरू केली असून, महाराष्ट्र राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये तिची अंमलबजावणी होणार आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका या निवडक क्षेत्रांचा समावेश आहे.


ही पूर्वचाचणी २० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घेतली जाणार असून या काळात जनगणनेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी घराघरात भेट देऊन माहिती संकलन करणार आहेत.


राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी जळगाव यांना प्रमुख जनगणना अधिकारी, तर तहसीलदार चोपडा यांना चार्ज अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.


स्वगणनेचा पर्याय उपलब्ध


नागरिकांना आपल्या मोबाईलद्वारे किंवा संगणकावरून स्वतःची माहिती भरता यावी म्हणून स्वगणना (Self Enumeration) ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान www.censusindia.gov.in या संकेतस्थळावर स्वगणना फॉर्म भरता येईल.

नागरिकांनी काय करावे?

घरातील सर्व सदस्यांची माहिती अचूकपणे द्यावी.

अधिकृत जनगणना कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

स्वगणना करताना आवश्यक माहिती (जसे की आधार क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, व्यवसाय, घराचे तपशील इ.) जवळ ठेवावी.

मिळालेला स्वगणना क्रमांक अधिकाऱ्यांना दाखवावा.

प्रशासनाचे आवाहन

चोपडा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,

“जनगणना ही देशाच्या नियोजनाची पायाभूत प्रक्रिया आहे. शासनाच्या विकास योजनांसाठी अचूक आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक घराने आणि नागरिकाने या पूर्वचाचणीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व स्वगणनेत सहकार्य करावे.”

No comments