चुंचाळेसह परिसरातील कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव उत्पन्नात घट नुकसान भरपाई मिळावी भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...
चुंचाळेसह परिसरातील कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव
उत्पन्नात घट नुकसान भरपाई मिळावी
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने अगोदरच कर्जाच्या खाईत पडलेल्या शेतकऱ्यांला या वर्षी कापसावर फार मोठी आशा होती पंरतु पाऊस जोरदार व अवकाळी पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट आली आहे त्यात बोडअळी व लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कापुस उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे या सर्व गोष्टींचा विचार केला असता त्याचा परीणाम उत्पादन घटीवर झाला आहे बर्याचशा झाडाना कैरी लागुन त्या सडली पडली व जी राहीली तीचा विकास न झाल्याने उत्पादन घटले एकरी एकरी चार ते पाच क्वीटल उत्पन्न हे शेतकऱ्यांना न परवडणारे आहे तसेच कापुस वेचणीस वेग आला असून काही शेतकऱ्याची शेती तर पहील्या वेच्यातच मोकळी झाल्या सारखी दिसत आहेत अगोदरच उत्पन्न कमी खर्च जास्त व त्यात कापुस भाव नपरवडणारे सारखे मागून व्यापारी लोक जणु काही शेतकऱ्यांची थट्टा करताना दिसत आहे अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्याचे उत्पादन खर्च निघणे मुश्कील होणार आहे खरीप पिकाची आशा कपाशीवर होत्या शेतकऱ्यांना त्या आशा धुसर होत असल्याचे चित्र आहे तरी शेतकरी बांधवाची झालेली बिकट अवस्था लक्षात घेऊन कपाशीसह सर्व शेतीमालास योग्य भाव मीळावा व लाल्या रोगाचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मीळावी अशी मागणी शेतकरी करीत आहे
प्रतिक्रिया.... वर्षेभरापासून बेमोसमी पाऊस व वादळा मुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे तरी जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा असे डिगबंर पाटील यांनी सागीतले आहे

No comments