सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यावल येथे भरली "शाळा पालकांची" भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यावल येथे भरली "शाळा पालकांची"
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 12/10/2025 रोजी सरस्वती विद्यामंदिर यावल येथे एका नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत " "शाळा पालकांची" भरवण्यात आली होती. यामध्ये शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पाल्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याशी पालकांची भूमिका, याबाबत सखोल असे मार्गदर्शन पालकांना करण्यात आले यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून,सौ.आरती चौधरी, डॉ.सौ.नीलिमा नेहते, डॉ. राहुल पांडे , श्री. एजाज शेख यांनी समतोल पालकत्व,स्क्रीन टाईम, मुलांचे आहार व विहार, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात पालकांची भूमिका या विषयावर उपयुक्त असे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ध्यानधारणा व योगासने बाबत शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.एस.बी.चंदनकार सर यांनी विशेष अशी माहिती दिली.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री.अरुण कुळकर्णी ,उपाध्यक्ष श्री.श्रीकांत सराफ, संचालक श्री.जी.डी. कुळकर्णी,
मुख्याध्यापक श्री. एस.एम. जोशी सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
श्री.बी.पी.वैद्य सर, प्रास्ताविक श्री.एस.एम.जोशी सर यांनी केले व आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक
श्री. एन.डी.भारुडे सर यांनी केले.
No comments