यावल येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त अभिवादन भरत कोळी यावल ता प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एक भारत, अखंड भारताचे ...
यावल येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त अभिवादन
भरत कोळी यावल ता प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एक भारत, अखंड भारताचे शिल्पकार आणि भारताचे लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त यावल येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
हा कार्यक्रम यावल खरेदी विक्री संघामध्ये पार पडला. यावेळी संघाचे व्हाईस चेअरमन अतुलदादा भालेराव यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे व जिनिंग प्रेस संचालक बाळासाहेब फेगडे, माजी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, संघाचे संचालक व माजी व्हाईस चेअरमन तेजस पाटील, माजी शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, शहर सरचिटणीस योगेश चौधरी, तसेच संघाचे मॅनेजर संजय भोईटे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सरदार पटेल यांच्या कार्याचा गौरव करत एकतेचा संदेश दिला.


No comments