खडसे महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर येथील श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालया...
खडसे महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न
सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर येथील श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात पी.एम. उषा अंतर्गत व आय. क्यू.ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने, "लिंग समानता"या विषयावर दिनांक 03/10/25 रोजी कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. प्रवीण बोरसे ( आर्ट ,सायन्स, कॉमर्स, कॉलेज धरणगाव) यांनी लिंग समानता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . त्यांनी, लैंगिक समानता एक वैधानिक महत्त्वपूर्ण मानवी अधिकार आहे. समानता म्हणजे समाजात स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता एक समृद्ध अर्थव्यवस्था व सतत विकास निर्माण करणे साठी दोघांना समान अधिकार व जबाबदाऱ्या स्वीकारणे गरजेचे आहे. लिंगाच्या आधारे कोणताही भेदभाव न करता समाजात स्त्री व पुरुष दोघांना आपल्या क्षमता पूर्णपणे विकसित करण्याची संधी मिळते. असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. छाया खर्चे यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम महाविद्यालयातील पी.एम. उषा चे समन्वयक डॉ.अनिल पाटील तसेच डॉ. अतुल वाकोडे यांची उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी होते.

No comments