घोडगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन तर्फे रन फॉर युनिटी द्वारे एकतेचा संदेश. चोपडा प्रतिनिधी (संपादक...
घोडगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन तर्फे रन फॉर युनिटी द्वारे एकतेचा संदेश.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनाक 31/10/2025 रोजी सकाळी 06.00 वाजता चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सि. बि. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोडगांव ता.चोपडा येथे लोहपुरुष मा. सरदार वल्लभ भाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस 2025 अनुषंगाने रन फॉर युनिटी निमित्ताने दौड सि. बि. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोडगांव ता.चोपडा ते महादेव मंदीर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पावेतो काढण्यात आली सदर दौडमध्ये पोस्टे हद्दीतील सामाजिक व राजकीय व्यक्ती व प्रतिष्ठित नागरिक, पोलीस अधिकारी व अंमलदार, पोलीस पाटील, हद्दीतील इतर नागरिक असे एकुण 150 ते 200 पुरुष व महिला सदर दौडमध्ये सहभागी झाले होते. सदर दौड कार्यक्रम 08.00 वाजता शांततेत समाप्त झाली आहे.

No comments