सायबर गुन्ह्यांविरुद्ध जनजागृती..सायबर पोलिसांचा चर्चमध्ये प्रभावी उपक्रम..! सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानग...
सायबर गुन्ह्यांविरुद्ध जनजागृती..सायबर पोलिसांचा चर्चमध्ये प्रभावी उपक्रम..!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२८):-“डिजिटल युगात जागरूकता हीच खरी सुरक्षा” या संदेशासह सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर तर्फे St. Saviour’s Cathedral Church,टाकळी रोड, अहिल्यानगर येथे सायबर अवेअरनेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात २०० ते २५० नागरिकांनी उपस्थित राहून सायबर सुरक्षेबाबत उपयुक्त मार्गदर्शन घेतले.हा कार्यक्रम श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलबुर्मे (अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
🔹 सायबर फसवणुकीपासून सावध राहा – पो.ना. अभिजीत अरकल
कार्यक्रमाची सुरुवात पोलीस नाईक अभिजीत अरकल यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी डिजिटल अरेस्ट, मोबाईल हॅकिंग, फेक अकाऊंट, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, तसेच आयटी ॲक्टअंतर्गत होणाऱ्या गुन्ह्यांविषयी सविस्तर माहिती दिली.
ते म्हणाले, “सायबर गुन्ह्यांपासून वाचायचं असेल तर आपली माहिती कोणाशीही शेअर करू नका. सावध राहिलात तरच सुरक्षित राहाल.”
🔹 सायबर क्राईमचे प्रकार PPT द्वारे सादर
यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी PPT द्वारे सायबर क्राईमचे विविध प्रकार समजावून सांगितले.
त्यांनी डेबिट/क्रेडिट कार्ड फसवणूक, ओटीपी शेअर न करणे, व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल फ्रॉड, बँकेच्या नावाने येणारे खोटे कॉल, फेक वेबसाइट्स, शेअर ट्रेडिंग स्कॅम, APK फाईलद्वारे हॅकिंग, तसेच नायजेरियन फ्रॉड याबाबत इशारा दिला.
त्यांनी नागरिकांना अनोळखी लिंक, ॲप, किंवा फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका असे आवाहन केले.
🔹 “मोबाईल दहशतवाद” व नवे सायबर फ्रॉड – पोलीस निरीक्षकांचे मार्गदर्शन
कार्यक्रमात पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी नव्या प्रकारच्या सायबर फसवणुकींची उदाहरणे देत माहिती दिली. त्यांनी मोबाईल दहशतवाद आणि आर्थिक फसवणुकीपासून कसे बचाव करावा यावरही मार्गदर्शन केले.
🔹 1930 आणि 1945 टोल-फ्री क्रमांकांची माहिती
प्राध्यापक वैभव लोंढे यांनी सायबर फसवणुकीच्या तक्रारींसाठीचे 1930 आणि 1945 हे टोल-फ्री क्रमांक नागरिकांना सांगितले आणि “सायबर फसवणुकीच्या घटनांपासून वाचण्यासाठी सावध व सतर्क राहणे अत्यावश्यक आहे” असे सांगितले.
🙌 यशस्वी आयोजनासाठी विशेष पुढाकार
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, पो.उ.नि. सुदाम काकडे, पो.ना. अभिजीत अरकल, प्रा. वैभव लोंढे, संजू काकडे सर आणि वाघमारे सर यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी सायबर सुरक्षा संदर्भातील प्रश्न विचारले आणि पोलिसांकडून मार्गदर्शन घेतले.


No comments