गांधी पीस फाउंडेशन काठमांडू, नेपाळ या संस्थेची मानद डॉक्टरेट पदवी बापूराव ठाकरे यांना बहाल. किरण चव्हाण अमळनेर (संपादक -:- हेमकांत गायकव...
गांधी पीस फाउंडेशन काठमांडू, नेपाळ या संस्थेची मानद डॉक्टरेट पदवी बापूराव ठाकरे यांना बहाल.
किरण चव्हाण अमळनेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे श्रमिक पत्रकार संघ ,पुणे या ठिकाणी दिमाखदार सोहळ्यात गांधी पीस फाउंडेशन काठमांडू, नेपाळ या संस्थेची मानद डॉक्टरेट पदवी अमळनेर येथील साने गुरुजी विद्यामंदिर चे उपशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना व्हाईस ऑफ मीडिया चे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख, राज्य कोअर कमिटी सदस्य, पत्रकार ,लेखक श्री बापूराव आनंदराव पाटील (ठाकरेसर) रा. मंगरूळ तालुका चोपडा ह. मु. अमळनेर यांना मराठी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध डॉ. विशाल राजू माने डॉ. नितीन धवणे पाटील मंगेश टिलेकर आणि ऍड. प्रणाली सूर्यवंशी पुणे यांच्या हस्ते मानद पदवी बहाल करण्यात आली.
तसेच अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ,मार्गदर्शक श्री. संदीप घोरपडे आणि गितांजली घोरपडे व साने गुरुजी विद्यामंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय, साने गुरुजी कन्या हायस्कूल यांच्या वतीने सहृदय सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार सर, इंजिनिअर गौतम मोरे, पत्रकार दयाराम पाटील, ईश्वर महाजन,अजय भामरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच परिवार,शिक्षण, कला, साहित्य, सामजिक, राजकीय क्षेत्रातून बापूराव ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षात होत आहे.

No comments