चोपडा तालुक्यातील अवैध मद्य व बनावट ताडी विक्री थांबवुन त्वरीत कारवाई करण्याची मागणी मानव विकास पत्रकार संघातर्फे (महाराष्ट्र राज्य) चोपडा...
चोपडा तालुक्यातील अवैध मद्य व बनावट ताडी विक्री थांबवुन त्वरीत कारवाई करण्याची मागणी
मानव विकास पत्रकार संघातर्फे (महाराष्ट्र राज्य) चोपडा यांची मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मानव विकास पत्रकार संघातर्फे निवेदन देत आहोत की,चोपडा शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बनावट दारु विक्रीचे प्रमाण वाढलेले असुन तालुक्यात व शहरात बनावट व बेकायदेशीर दारु विक्रीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन शासनाचा महसुल देखील मोठया प्रमाणात बुडत आहे. तरी तालुक्यातील बनावट दारू व ताडी विक्रेत्यांवर त्वरीत कारवाई करण्यात येऊन नागरिकांचे होणारे शोषन व पिडवणुक व शासनाची फसवणुक थांबवण्यात यावी.
चोपडा शहर व तालुक्यात आणि मध्य प्रदेशाच्या सिमेलगत असल्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मद्याची अवैद्य वाहतुक वाहनांद्वारे होत असते.सदरील वाहनांची तपासणी करण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येऊन अवैद्य विक्रेत्यांवर व ढाबा मालक व हॉटेल मालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी.तसेच विनापरवाना मद्य विक्री करणारे अवैद्य ढाबा / हॉटेल यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.कारण बनावट मद्य तसेच गावठी हातबट्टी दारुच्या सेवनामुळे जिवीतहानी व गंभीर स्वरुपाचे आजार होण्याची किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते.तसेच चोपडा तालुक्यातील किरकोळ व ठोक मद्य परवाना धारक यांच्या अनुज्ञेप्ती मध्ये जर बनावट मद्य आढळून आले तर त्यांची अनुज्ञेप्ती कायम स्वरूपी रद्द करणेत यावी. त्याच प्रमाणे मद्य बाळगतांना मद्यसेवन,मय वाहतुक करतांना अथवा मद्य विक्री करतांना किंवा आपल्या जागेचा वापर अवैद्य ढाबा चालविणेसाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी.तसेच बनावट ताडी विक्रेत्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी.तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आपल्या अखत्यारीत असलेले सर्व परिसरातील दारू व ताडी बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येवुन नागरिकांची आरोग्याचे होणारे नुकसान व शासनाची होणारी फसवणुक त्वरीत थांबविण्यात यावी म्हणून हे निवेदन आहे. सदरील निवेदनाची दखल घ्यावी, निवेदनाची दखल न घेतली गेल्यास मानव विकास पत्रकार संघातर्फे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
No comments