adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस चोपडा शहर पोलीसांकडून अटक , सराईत आरोपीस शिरपूर येथुन केली अटक चोपडा शहर पोलीसांची कारवाई

  घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस चोपडा शहर पोलीसांकडून अटक सराईत आरोपीस शिरपूर येथुन केली अटक चोपडा शहर पोलीसांची कारवाई   चोपडा प्रतिनिधी (सं...

 घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस चोपडा शहर पोलीसांकडून अटक

सराईत आरोपीस शिरपूर येथुन केली अटक चोपडा शहर पोलीसांची कारवाई  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 चोपडा शहरातील सेवानिवृत्त नागरीक विजय नारायण बाविस्कर, वय ६९ वर्ष, राहणार देशमुख नगर, यावल रोड, चोपडा यांचे राहते घरी दिनांक २९/०९/२०२५ च्या रात्री ११:०० ते दिनांक ३०/०९/२०२५ चे पहाटे ०५:०० वाजेदरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने घरफोडी करुन घरातील सोन्याचे दागिने व मोबाईल फोन चोरी केला होता. त्याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५५२/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३०(२), ३३१, ३३१ (४), ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करुन तपास चालु करण्यात आला होता.

गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना चोरीस गेलेल्या मोबाईल फोनच्या तांत्रिक माहितीच्या आधारे चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोउपनि चेतन परदेशी व पथकाने दोन ते तीन दिवस शिरपुर परिसरात सापळा लावून आरोपीचा शोध घेतला. तपासाअंती आरोपी नामे प्रकाश विजय पावरा, वय २८ वर्ष, रा.तोरणमाळ, ता.धडगाव, जि. नंदुरबार याने सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यास दिनांक १२/१०/२०२५ रोजी शिरपुर शहरातुन ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी हा घरफोड्या व चोरी करणारा सराईत आरोपी असुन त्याचेवर यापूर्वी शहादा पोलीस स्टेशन व दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे १० ते १२ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. दोंडाईचा येथे एका वकीलाचे घरफोडी करुन चोरी केली होती. तसेच शहादा येथील कोर्टाचे तत्कालीन न्यायाधिश यांच्या शासकीय निवासस्थानी देखील त्याने घरफोडी केली होती. सदर गुन्हयांमध्ये त्याला पुर्वी अटक देखील करण्यात आलेली आहे.नमुद आरोपी कडे कौशल्यपुर्वक तपास करुन त्याचेकडुन चोपडा येथील घरफोडी मधील खालील नमुद मुद्देमाल शिरपुर येथुन हस्तगत करण्यात आला आहे.

१)१००००/- रुपये किंमतीच्या २ सोन्याच्या अंगठ्या व २ बेन्टेक्सच्या नकली अंगठया जु.वा.कि.अ. २)२००००/- रुपये किंमतीची सोन्याची गळ्यातील साखळी गोप सारखी दिसणारी त्यात M इंग्रजी अक्षर षटकोणाकृती आकाराची जु.वा.कि.अ.

३) ३०००/- रुपये किंमतीचा टेक्नोस्पार्क गो कंपनीचा अँड्राइड मोबाईल त्यात जिवो कंपनीची सिम क्रमांक ९८२३४०९०३५ असे असुन त्याचा IMEI नंबर-३५७३४९२२४८८२२४१ व

IMEI नंबर ३५७३४९२२४८८२२५८ असा जु.वा.कि.अ.

४)१००००/- रु. किंमतीची ३ ग्रॅम सोन्याच्या गोल रींगा (बाळया). जु.वा. किं.अं.

५)१०००/- रु. किंमतीची ३ भार वजनाचे चांदीची गळयातील चैन. जु.वा. किं.अं.

६)७००/- रु. किंमतीची २ भार वजनाचे पायातील पैंजण. जु.वा.किं.अं.

७) ६००००/- रु. किंमतीची यमाहा कंपनीची YBR ११० हि दुचाकी वाहन क्र. MH १८ AF ९५८२. एकुण १,०४,७००/- रुपये, वरीलपैकी काही मुद्देमाल हा चोपडा येथे जुन महिन्यात झालेल्या घरफोडीच्या अनुषंगाने दाखल असलेल्या गु.र.नं. ३५२/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (४), ३३१(३), ३०५ (अ) यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचे दागिने हे आरोपीने वाघबडली, ता.शिरपुर, जि. धुळे शिवारात एका शेतामध्ये यमाहा YBR११० या मोटारसायकल मध्ये लपवुन ठेवले होते. त्यामुळे सदर मोटारसायकल तेथुन जप्त करण्यात आली आहे. अशाप्रकारे चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले २ घर फोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे. सदर कामगिरी ही श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक, जळगाव व श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव परीमंडळ, श्री. अण्णासाहेब घोलप, उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि एकनाथ भिसे, पोउपनि चेतन परदेशी, पोहवा / ज्ञानेश्वर जवागे, पोशि/ मदन पावरा, पोशि/ अजिंक्य माळी, पोशि/योगेश पाटील, पोशि/ विलास पारधी यांनी पार पाडली. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि चेतन परदेशी हे करीत आहेत.

No comments