पकडलेले जेसीबीचे कुठलेही कागदपत्र व दंड न करता सोडून दिल्या याबाबत, सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली होती तक्...
पकडलेले जेसीबीचे कुठलेही कागदपत्र व दंड न करता सोडून दिल्या याबाबत, सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली होती तक्रार
विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांचे शासन नियमातील तरतुदीनुसार चौकशी करून उचित कारवाईचे आदेश
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ - येथील तहसीलदार यांनी पदाचा गैरवापर करून पकडलेले जेसीबी कुठलाही कागदपत्र व दंड न करता सोडून दिले होते. याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिकचे प्रविण गेडाम यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची दखल घेत त्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना याप्रकरणी शासन नियमातील तरतुदीनुसार चौकशी करून उचित कारवाईचे आदेश दिले आहेत.
याबाबत माहिती अशी की, वरणगाव परिसरात दि.14 जुलै 2025 रोजी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली होती. यात चार वाहने जप्त करण्यात आली होती. ही कारवाई तहसिलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी रजनी तायडे यांच्या नेतृत्वात तलाठी सुप्रिया बिराजदार, रेणुका पाटील, नितीन केले, रोशन कापसे व जितेश चौधरी यांच्या संयुक्त सहभागाने पार पडली. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी इ. वाहने पोलिस बंदोबस्तात भुसावळ तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आली होती. त्यातील ट्रॅक्टर व डंपर यांनी दंड भरून सोडण्यात आले होते. व सदरील जेसीबी कुठलेही कागदपत्र न तपासता तसेच कुठलाही दंड न करता दि. 11 जुलै 2025च्या शासन निर्णया माहिती असतांना सुध्दा संबंधित तहसीलदार निता लबडे यांनी सोडून दिले. या संदर्भात सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी दि.15/9/2025 रोजी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. तसेच या तक्रार अर्जात तहसीलदार नीता लबडे यांची चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी देखील केली होती.
या तक्रार अर्जाची दखल घेत विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिकचे प्रविण गेडाम यांनी दि.30-9-2025 रोजी पत्र क्र. मशा-2/ कार्य/ गोख/ई टपाल नं.6846697/2025 अन्वये जिल्हाधिकारी जळगाव यांना सदर अर्जात नमुद केलेल्या बाबींच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून शासन नियमातील तरतुदीनुसार अवश्यक ही उचित कारवाई करण्यात यावी व केलेल्या कारवाईबाबत अर्जदार यांना अवगत करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे.

No comments