adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सराफ दुकानातील जबरी चोरीचा थरार 12 तासांत गुन्ह्याचा उलगडा.. कुख्यात गुंडाच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

 सराफ दुकानातील जबरी चोरीचा थरार 12 तासांत गुन्ह्याचा उलगडा.. कुख्यात गुंडाच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:-...

 सराफ दुकानातील जबरी चोरीचा थरार 12 तासांत गुन्ह्याचा उलगडा.. कुख्यात गुंडाच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि२८):-लोणी येथील अजय ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या झालेल्या जबरी चोरीच्या थरारक प्रकरणाचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत पर्दाफाश करत कुख्यात गुंड बबन घावटे याला त्याच्या साथीदारासह जेरबंद केले आहे.पिस्तुलासह मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी फरार आहेत. या कारवाईमुळे परिसरात समाधानाचा श्वास सोडला आहे.फिर्यादी राजेंद्र ताराचंद नागरे (वय 54) हे दि.27 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी अजय ज्वेलर्स दुकानात असताना त्यांचा ओळखीचा बबन घावटे व तीन अनोळखी साथीदार मारुती स्विफ्ट कारने दुकानात घुसले.बबन घावटेने फिर्यादीच्या मयत चुलत भावाचा बदला घेण्यासाठी पैसे दे,अशी मागणी केली.पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी कमरेतील पिस्तुल दाखवून कुटुंबास गोळ्या घालण्याची धमकी देत भिंतीवरील काच ट्रेमधील 5 सोन्याचे नेकलेस हिसकावले व मोबाईल चोरी केला तसेच झटापटीत फिर्यादीस दुखापतही केली.या प्रकरणी लोणी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 612/2025 अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी यांना समांतर तपासाचे आदेश दिले.त्यानुसार दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. आणि अखेर 28 नोव्हेंबर रोजी रात्री बेलवंडी फाटा येथे सापळा लावून आरोपींचा शोध लावला.

बेलवंडी ते श्रीगोंदा रोडवर स्विफ्ट कार (MH 16 DS 0516) येताना दिसली. पथकाने कार अडवून दोघांना ताब्यात घेतले.बबन भाऊसाहेब घावटे (वय 33, रा. श्रीगोंदा),कृष्णा पोपट गायकवाड (वय 35, रा. हिंगणी, श्रीगोंदा),चौकशीत बबन घावटेने गुन्ह्याची कबुली दिली. इतर दोन आरोपी संकेत जाधव (पुणे) व करण खरात (श्रीगोंदा) फरार असल्याचे समोर आले.ही धाडसी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि संदिप मुरकुटे,अनंत सालगुडे, रमेश गांगर्डे,गणेश लबडे,दीपक घाटकर,फुरकान शेख,रिचर्ड गायकवाड,शाम जाधव, भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,रमीझराजा आत्तार, बाळासाहेब गुंजाळ,सागर ससाणे, प्रशांत राठोड,मनोज साखरे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक महादेव भांड, अर्जुन बडे यांनी केली आहे.

No comments