adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

 श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा  श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) देशाची एकता ...

 श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

देशाची एकता आणि अखंडता जपण्यासाठी भारत हा विविध धर्म भाषा आणि परंपरांनी भरलेला देश आहे या विविधतेतून एकतेचा संदेश टिकून ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे, राष्ट्रीय एकता दिवस साजरा करून नागरिकांना एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना रूढ करण्याचा या पाठीमागील उद्देश आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांची आठवण ठेवण्यासाठी ३१ ऑक्टोबर हा भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंती दिवस आहे त्यांनी भारतातील ५६२ संस्थानांना एकत्र करून भारताला अखंड राष्ट्र बनवले त्यांच्या या महान कार्याच्या स्मरणार्थ राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो, राष्ट्रीय ऐक्याची जाणीव निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करून देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय भावना, परस्पर विश्वास आणि सहकार्य याचा संदेश दिला जातो. विविध प्रांतातील लोकांमध्ये एकमेकाबद्दल आदर निर्माण व्हावा हा उद्देश असतो तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी सरदार पटेल यांच्या दृढ निश्चय , देशप्रेम आणि कार्य तत्परतेचा आदर्श तरुण पिढी समोर ठेवून त्यांना प्रोत्साहित केले जाते, राष्ट्रीय एकता दिवसाचा संदेश "एकता हीच भारताची खरी ताकद" आहे सरदार पटेल यांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रत्येक भारतीयाने देशाच्या अखंडतेसाठी आपले योगदान द्यावे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे त्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी "एकता दौड" म्हणजे (रन फॉर युनिटी) हा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भंवर, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, आजी- माजी सैनिक संघटनेचे मेजर कृष्णा सरदार, मेजर बाळासाहेब बनकर, मेजर संग्राम यादव ,मेजर अशोक कायगुडे ,मेजर राजेंद्र आढाव, युनायटेड इंडिया इन्शुरन्स तथा परिवर्तन फाउंडेशन चे गोरख आढाव तसेच श्रीरामपूर मधील शासकीय ,राजकीय , शैक्षणिक, सामाजिक संघटना, मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


वृत्त विशेष सहयोग

मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर 

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments