📱 मोबाईल टावर कंपन्यांकडून ग्राहकांची लूट ? महागडे रिचार्ज, पण नेटवर्क गायब — ग्रामीण भागातील ग्राहकांसह शहरी भागातह संताप उफाळतांना दिसू...
📱 मोबाईल टावर कंपन्यांकडून ग्राहकांची लूट ?
महागडे रिचार्ज, पण नेटवर्क गायब — ग्रामीण भागातील ग्राहकांसह शहरी भागातह संताप उफाळतांना दिसून येत आहे
नमस्कार मित्रांनो मी आज एक परत नविन विषयावर लिहित आहे वरील टायटल पाहून लक्षातच आले असेल की आजचा विषय मोबाईल टावर कंपन्यावर आपला देश खुप प्रगती करतोय यात सर्वांचा वाटा आहेच परंतु एक सर्वांना जोडणारा आपल्या पासुन शेकडो किलोमीटर लांब राहणाऱ्या आपल्या नातलगांना, ऑनलाईन काम लवकर करुन देणाऱ्या मोबाईल, लॅपटॉप यासाठी लागते ते नेटवर्क ते आधी खुप सुरळीत मिळायचे पण सध्या आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा माणसाचा जीव झाला आहे. संवाद, काम, शिक्षण, मनोरंजन, बँक व्यवहार – सर्व काही मोबाईलच्या नेटवर चालतं. पण प्रश्न असा की, आपण खरोखरच ज्या मोबाईल कंपन्यांना पैसे देतो, त्या आपल्या सेवेसाठी प्रामाणिक आहेत का?
ग्राहकांकडून दर महिन्याला महागडे रिचार्ज घेतले जातात — ₹239, ₹299, ₹499, ₹719… पण त्याच्या बदल्यात मिळतं काय? आपण जाणकार आहातच आज जर का कुणी आपल्याला शेंगदाण्याच्या भावात चिंचोके मोजले तर आपण ते घेवू का ? नाही ना मग ह्या कंपन्या रिचार्ज चे इतके भाव वाढवून साध 2G,3G,4G नेट उपलब्ध करून देत नाहीत परत समस्या खालील प्रमाणे
👉 नेट स्पीड एवढा कमी की एक साधं व्हिडिओ लोड व्हायला मिनिटं लागतात.
👉 कॉल ड्रॉप्स, आवाज कट-कट होणं, सिग्नल गायब होणं — हे तर रोजचंच.
👉 आणि ग्राहक सेवा? फोन लावा तर रेकॉर्डेड मेसेज ऐका — “आपला कॉल आम्हाला महत्त्वाचा आहे.” पण उत्तर कुठेच नाही!
कंपन्यांचा नफा, ग्राहकांची फसवणूक
मोठमोठ्या जाहिरातींमध्ये “सर्वात वेगवान नेटवर्क”, “सगळ्यात मोठं कव्हरेज” अशा घोषणा झळकतात. पण प्रत्यक्षात ग्राहकांना मिळतं नेटवर्कचा त्रास आणि असहाय्यता.
ग्रामीण भागात तर परिस्थिती आणखीनच बिकट — चारही नेटवर्कचे टॉवर असूनही नेट चालत नाही. अनेकदा विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास, फॉर्म भरताना त्रास सहन करावा लागतो. कामगारांना UPI व्यवहारात समस्या येतात.
हे सगळं पाहून एक प्रश्न मनात येतो —
कंपन्या ग्राहकांच्या पैशावर मजा करतात, पण जबाबदारी कोण घेणार?
सरकार आणि TRAI कुठे आहेत?
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) नेहमी “नेट क्वालिटी सुधारू” असे आश्वासन देते, पण जमिनीवर फारसा फरक दिसत नाही.
ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होतं, तर कंपन्यांचा नफा अब्जावधींमध्ये वाढतो.
🌐 डिजिटल भारत की नेटवर्क भारत?
“डिजिटल इंडिया” म्हणताना अभिमान वाटतो, पण “नेट नाही चालत” म्हणताना लाज वाटते.
आजच्या तरुण पिढीला स्थिर इंटरनेट ही लक्झरी नव्हे — ती गरज आहे.
तरीही मोबाईल कंपन्यांची बेफिकीरी संपलेली दिसत नाही.
आता वेळ आली आहे — ग्राहक जागा व्हा!
आपणच जर आवाज उठवला नाही, तर ही लूट चालूच राहील.
👉 कंपनीला नियमित तक्रार नोंदवा
👉 TRAI कडे ऑनलाईन तक्रार दाखल करा
👉 सोशल मीडियावर आपल्या समस्यांचा आवाज बुलंद करा
कारण, ग्राहकच राजा आहे — पण तो जागा राहिला तरच!
मोबाईल कंपन्यांच्या जाहिराती चमकतात, पण नेटवर्क नाही.
महागडं रिचार्ज घेताना थोडं विचार करा —
आपण खरंच “डेटा” घेतोय की फक्त “धोका”? आहे ना मित्रांनो सत्य काय खेळ चालवलाय कंपन्यांनी

No comments