मराठा महासंघाच्या तेल्हारा तालुका उपाध्यक्षपदी विकी खुमकर यांची निवड अकोला प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथील सामाजिक कार्यात स...
मराठा महासंघाच्या तेल्हारा तालुका उपाध्यक्षपदी विकी खुमकर यांची निवड
अकोला प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे पवन उर्फ विकी खुमकर यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तेल्हारा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. समाजकारणात सतत सक्रिय असलेले व अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे खुमकर हे मराठा समाजाच्या हितासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीने
तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

No comments