adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सचिन तायडे यांच्याकडे मलकापूर उपविभागासह जळगाव जा. उपविभागाचा पदभार

 सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सचिन तायडे यांच्याकडे मलकापूर उपविभागासह जळगाव जा. उपविभागाचा पदभार  अमोल बावस्कार बुलढाणा (सं...

 सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सचिन तायडे यांच्याकडे मलकापूर उपविभागासह जळगाव जा. उपविभागाचा पदभार 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर : मलकापूर व नांदुरा तालुक्यात आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत अनेक रस्ते, इमारती व पुलांची दर्जेदार कामे करून घेणारे सार्वजनिक उपविभागाचे उपविभागीय अभियंता (क्लास १ अधिकारी) सचिन तायडे साहेब यांच्याकडे आता जळगाव जामोद उपविभागाचा कार्यभार आला असून या अंतर्गत जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यात ते कार्यरत असणार आहेत.

सार्वजनिक उपविभागीय बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता (क्लास १ अधिकारी) सचिन तायडे यांनी पदभार घेतल्यानंतर मलकापूर व नांदुरा तालुक्यातील अनेक रस्ते, इमारती व पुलांची दर्जेदार कामे त्यांच्या देखरेखीखाली झाली. अनेकदा काही रस्ते वा काही विकासात्मक कामांबाबत वाद असल्यास सर्वसामान्य जनतेशी सौजन्यपुर्वक वागणूक व हितगुज करत अनेक अडचणींचा त्यांनी निपटाराही वेळोवेळी केला आहे. त्यांच्या कार्यकौशल्यामुळे व अंगी असलेल्या सहकार्याच्या भावनेमुळे त्यांनी अल्पावधीतच विभागातही वेगळी छाप निर्माण केली असून त्यांच्या कार्यशैलीचे अनेकदा कौतुक झाले असून त्यांना कार्यालयीन स्तरावरील अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत. तर उत्कृष्ट अभियंता म्हणून शासनाकडे त्यांचे नामांकनही दाखल झाले होते.

नुकताच जळगाव जामोद उपविभागाचा भार त्यांच्या खांद्यावर आला असून जळगाव जामोद उपविभागा अंतर्गत असलेल्या जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यासह मलकापूर उपविभागीय उपविभागाचे मलकापूर व नांदुरा हे २ तालुके म्हणजेच एकूण ५ तालुक्यांचा कारभार त्यांच्या देखरेखीखाली चालणार असून मलकापूर, नांदुरा प्रमाणे जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यातही त्यांच्या देखरेखीखाली अनेक रस्त्यांचे, पुलांचे, इमारतीची विकास कामे दर्जेदार होईलच, अशी अपेक्षा आहे.

No comments