adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या हक्काच्या ५ % टक्के निधी वाटपासाठी मलकापूर ग्रामपंचायतीकडे निलेश चोपडे यांनी दिले निवेदन

 दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या हक्काच्या ५ % टक्के निधी वाटपासाठी मलकापूर ग्रामपंचायतीकडे निलेश चोपडे यांनी दिले निवेदन  मलकापूर प्रतिनिधी: ...

 दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या हक्काच्या ५ % टक्के निधी वाटपासाठी मलकापूर ग्रामपंचायतीकडे निलेश चोपडे यांनी दिले निवेदन 


मलकापूर प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर तालुक्यातील मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत स्वउत्पन्नातून राखीव   ५% टक्के निधी आता पर्यंत वितरित न झाल्याने, या निधीच्या तत्काळ वितरित करण्याची मागणी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन, मलकापूर यांच्या वतीने निलेश चोपडे यांनी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की  ग्रामपंचायत स्वउत्पन्नातून राखीव असलेला ५ % टक्के  दिव्यांग बांधवांना  देण्यात येणारा निधी हा आतापर्यंत वितरित न झाल्यामुळे दिव्यांग बांधवांची दिवाळी ही अंधारात गेली या दिव्यांग बांधवांना आपला उदार निर्वाह करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावा लागतो तसेच अनेक अडचणीचा सामना करावा लागतो व शासनाकडून देण्यात येणारी तुटपुंजे मानधन हे पण वेळेवर मिळत नसल्यामुळे तिची अवस्था अत्यंत बिकट होऊन गेलेली असते त्यामुळे दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे यांनी निवेदनाद्वारे

 मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत ला ग्रामपंचायत कडून देण्यात येणारा दिव्यांग निधी हा  दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी, रोजगार निर्मितीसाठी, शैक्षणिक मदतीसाठी, वैद्यकीय साधनसामग्री व स्वावलंबनासाठी हा निधी वापर करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. 

तसेच मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायती ला निवेदन मिळताच क्षणी या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.व येत्या आठ दिवसांमध्ये दिव्यांग बांधवांच्या निधीचे वितरण न झाल्यास, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे यांनी दिला आहे. या प्रसंगी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश ठाकूर, महाराष्ट्र राज्य सल्लागार पंकज मोरे, तसेच अशोक गाढवे, अंकित नेमाडे, संतोष गणगे, प्रवीण पाटील, राष्ट्रवादीचे शे.वसीम आदी पदाधिकारी, दिव्यांग बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments