adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आम्हाला गॅस सिलेंडर चिन्ह का रोखताय? वंचित बहुजन आघाडीचा आरोप

 आम्हाला गॅस सिलेंडर चिन्ह का रोखताय? वंचित बहुजन आघाडीचा आरोप      लातूर जि. प्र. (उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) निलंगा नगर परिष...

 आम्हाला गॅस सिलेंडर चिन्ह का रोखताय?

वंचित बहुजन आघाडीचा आरोप   


  लातूर जि. प्र. (उत्तम माने)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

निलंगा नगर परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने निर्णय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत आज लिखित तक्रार नोंदवली. पक्षाचे नगराध्यक्ष आणि नऊ नगरसेवक पदाचे उमेदवार पूर्ण प्रक्रिया करून रिंगणात असताना, सर्वांना एकसमान ‘गॅस सिलेंडर’ चिन्ह देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पक्षाने दिलेल्या निवेदनानुसार, निर्णय अधिकाऱ्यांनी केवळ नगराध्यक्ष पदाला सिलेंडर चिन्ह देण्याची तयारी दाखवली, तर नगरसेवक पदांसाठी वेगवेगळी चिन्हे देण्याची शक्यता व्यक्त केली. “एकाच पक्षाच्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्हे देणे म्हणजे आमच्या प्रचारात गोंधळ निर्माण करणे,” असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला. यामुळे उमेदवारांमध्ये मोठा संताप असून, “सर्वांना एकसमान ‘गॅस सिलेंडर’ चिन्ह मिळालेच पाहिजे,” अशी ठाम मागणी करण्यात आली. मागणी न मानल्यास निवडणूक कार्यालयात शांततामय पण तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दिलेल्या तक्रारींवर मुजीब रशीद साब सौदागर सौ. मंजू हिरालाल निंबाळकर, डॉ. हिरालाल गणपतराव निंबाळकर, देवदत्त मच्छिंद्र सूर्यवंशी (प्रभारी)यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.या प्रकरणामुळे निलंग्यातील निवडणूक वातावरणात नवा तणाव निर्माण झाला आहे.

No comments