adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

समाजसेवक परशुराम बाबुराव लोखंडे व संवेदनशील पत्रकार श्रीमती अनघालक्ष्मीदुर्गा यांच्या उपस्थितीत मा. अण्णा हजारे यांना समक्ष भेटून विविध मागण्यांचे निवेदन सादर

 समाजसेवक परशुराम बाबुराव लोखंडे व  संवेदनशील पत्रकार श्रीमती अनघालक्ष्मीदुर्गा यांच्या उपस्थितीत मा. अण्णा हजारे यांना समक्ष भेटून विविध मा...

 समाजसेवक परशुराम बाबुराव लोखंडे व  संवेदनशील पत्रकार श्रीमती अनघालक्ष्मीदुर्गा यांच्या उपस्थितीत मा. अण्णा हजारे यांना समक्ष भेटून विविध मागण्यांचे निवेदन सादर 


राळेगणसिद्धी प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पोलीसांच्या आठ तास कर्तव्याचा शासन निर्णय जारी करावा, सेवानिवृत्त पोलीसांना कुटुंब आरोग्य योजना लागू करण्यात यावी, बि.आय.टी. चाळीतील शासकीय निवासस्थाने मोबदला घेऊन पोलीसांना मालकी हक्काने देण्यात यावीत, २०१३ घ्या PSI परि‌क्षेतील उत्तीर्ण पोलीसांना त्वरित PSI पदी पदोन्नती देण्यात यावी. साप्ताहिक सुट्टी व नैमित्तिक रजा वेळेवर देण्यात याव्यात,  या मागण्यांचे निवेदन ताज्या दमाचे समाजसेवक परशुराम बाबुराव लोखंडे यांनी संवेदनशील पत्रकार श्रीमती अनघालक्ष्मीदुर्गा यांच्या उपस्थितीत मा. अण्णा हजारे यांना समक्ष भेटून दिले आहे. 


वरील मागण्यांसाठी  पोलीसांच्या कल्याणासाठी त्याचप्रमाणे गेल्या ७० वर्षांपासून आग्रीपाडा बि.आय.टी. चाळ क्र. २ मधे रहात असलेल्या श्रीमती भारती साळवी या माऊलीवर विकासकाकडून होत असलेल्या अन्यायाचे व इतर बेकायदा कृत्य व दडपशाहीविरुधद अन्नजल वर्ज्य उपोषण करण्याकरिता थोर समाजसेवक अण्णा हजारे तसेच खंडुअण्णा गव्हाणे यांचे आशिर्वाद आणि मार्गदर्शन परशुराम बाबुराव लोखंडे यांना लाभले आहेत.

No comments