" सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संविधान दिवस साजरा" भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमक...
" सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संविधान दिवस साजरा"
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संविधान दिवस शाळेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप माहेश्वरी सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . शीला तायडे मॅडम यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ॲड . नितीन चौधरी सर हे होते .सर्वप्रथम अतिथीं च्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले .त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .शीला तायडे मॅडम यांच्या हस्ते प्रमुख अतिथी ॲड . श्री नितीन चौधरी सर व शाळेचे अध्यक्ष डॉ . श्री प्रदीप माहेश्वरी सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीं नी विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त व आज काल आपल्या समाजामध्ये ज्या लहान मुलींसोबत अप्रिय घटना घडत आहेत अश्या घडू नये आणि विद्यार्थ्यांनी कसे त्याला प्रतिबंध करावा यासाठी त्यांनी बाल लैंगिक व पोस्को कायद्याबद्दल आणि गुड टच आणि बॅड टच याबद्दल माहिती सांगून अमुलाग्र असे मार्गदर्शन केले. व नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सुद्धा मुलांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाच्या शेवटी संविधान दिनाची शपथ देऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अर्चना चौधरी मॅडम यांनी केले होते तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

No comments