किसान महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा पारोळा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पारोळा येथील किसान महाविद्यालयात बुधवार दि.26 न...
किसान महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा
पारोळा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पारोळा येथील किसान महाविद्यालयात बुधवार दि.26 नोव्हेंबर 2025 रोजी 75 वा भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ जी.एच. सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ डी.बी. साळुंखे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा के. एस. गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगतातून डॉ. जी. एच. सोनवणे यांनी भारतीय संविधानातील समाविष्ट असलेल्या सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, गणराज्य, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्राची एकता आणि एकात्मता, मताधिकार यासारख्या लोकशाही मूल्यांबाबत मार्गदर्शन केले. भावी पिढीला भारतीय संविधानाचे महत्त्व लक्षात यावे आणि त्यांच्यात संविधानिक मूल्यांची रुजवन व्हावी हा उद्देश सदर कार्यक्रमाचा होता. सूत्रसंचालन डॉ. के डी. पाटील यांनी तर आभार डॉ.विलास महाजन यांनी मांडले कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

No comments