चोपडा तालुक्यातील शेतकरी भारतीय नागरिक नसल्यामुळेच त्यांना कोणतेही कारण न देता दुष्काळातून वगळले,त्यामुळे आम्हाला तसा दाखला द्यावा यासाठी ...
चोपडा तालुक्यातील शेतकरी भारतीय नागरिक नसल्यामुळेच त्यांना कोणतेही कारण न देता दुष्काळातून वगळले,त्यामुळे आम्हाला तसा दाखला द्यावा यासाठी एस बी पाटील यांचा अर्ज...
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
....राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३५०००कोटींचे पॅकेज,मात्र त्या यादीत आधी समाविष्ट करून दोनच तासात चोपडा तालुक्याला वगळले,त्यासाठी सरकारने कोणत्याच प्रशासकीय प्रक्रियेत न जाता हे तालुके वगळले, ती चूक लक्षात आल्यावर देखील ती दुरुस्त करण्याऐवजी चोपड्यात दुष्काळच नाही त्यासाठी ना मदत ना पंचनामे.सरकार जाणीवपूर्वक हे करीत असून येथील शेतकरी त्यांना भारतीय वाटत नसतील, तर त्यांना रीतसर तुम्ही आमचे नागरिक नाहीत असा दाखला देऊन हाकलून लावा यासाठी रीतसर अर्ज देखील आज एस बी पाटील यांनी दिला.
प्रशासनाला लक्षात आणून दिले की चोपडा तालुक्यात एकूण ६४०००हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्रातील फक्त सात ते आठ हजार केळी असते व फक्त ७००हेक्टर ऊस आहे *.म्हणजे एकूण ५५०००हेक्टर वर कापूस,मका,उडीद,मूग आहे.*
कापूस फुलावर असताना व मका निसवणीत असताना १५दिवसाचा पावसाचा खंड पडला म्हणून जे नुकसान झाले ते भरून निघू शकत नाही. कापसाला पाणी देण्याची सोय असली तरी त्या काळात ते देता येत नाही,कारण जर ट्यूबवेल चे पाणी भरले व नंतर पाऊस आला तर संपूर्ण फुलगळ होते व फक्त हिरवे पना असतो, त्यामुळे सोय असताना देखील पाणी देता येत नाही ,म्हणून पावसाचा खंड केव्हा यावर खूप काही अवलंबून असते.
तसेच वेचणी काळात प्रचंड पाऊस व संपूर्ण महिनाभर ढगाळ वातावरण त्याने कापसाचे बोंड उलले नाही व बोंड अळी सारखे रोगाला ते बळी पडते हे कोण सांगणार सरकारला.
त्या सोबत ऑक्टोबर महिन्यातील सतत ९दिवस अवकाळी पावसाने पूर्ण कापूस काळवंडला,सरकी सडली जिच्यामुळे कापसाला वजन मिळते व भाव मिळतो.तेच गेले व मका सडला.कुठे उत्पादन आले हे सरकारने दाखवावे असा उद्विग्न प्रश्न देखील प्रशासनाला आज विचारला.
फक्त खोट्या घोषणा करून प्रत्यक्षात नुकसान भरपाई द्याव्या लागू नये, यासाठी जर प्रशासन खोटे रिपोर्ट करण्यासाठी असेल, तर त्यांनी सरळ आम्हाला तुम्ही भारताचे नागरिक नाहीत असा सांगून तसा दाखला द्यावा म्हणजे "ना रहेगा बास ना बजेगी बासरी",अशी भावना देखील यावेळी व्यक्त केली.
निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी स्वीकारले यावेळी एस बी पाटील, डॉ सुभाष देसाई, डॉ रवींद्र निकम, भगवान पाटील,कुलदीप पाटील,अजय पाटील,मोहन पाटील,सतीश पाटील,चंद्रकांत पाटील,नारायण पाटील यांचेसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.


No comments