भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक ०३ चे अधिकृत उमेदवार पवन भाऊ पारधी यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- ह...
भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक ०३ चे अधिकृत उमेदवार पवन भाऊ पारधी यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ०३ मध्ये वाढता उत्साह दिसत असून भारतीय जनता पार्टीचचे उमेदवार श्री पवन भाऊ सीताराम पारधी यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घराघरातून, गल्लीगलीतून फक्त एकच हाक - "पवन भाऊ, यावेळेस तुझ्या सोबत पूर्ण प्रभाग!"प्रभागातील नागरिक त्यांचे मनपूर्वक स्वागत करत असून त्यांच्या प्रचाराला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.कार्यकर्ता म्हणून पवन भाऊ पारधी यांनी होम टू होम असा घराघरातील संवादाचा प्रचार मोहीम हाती घेतली असून या मोहिमेने प्रभागात चांगला जनसंपर्क लाट निर्माण केली आहे.त्यांच्या मते, "सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.
जनसेवा हेच माझे ध्येय असून प्रभागातील प्रत्येक नागरिकांसाठी मी सदैव उपलब्ध राहीन.प्रभाग क्रमांक ०३ मधील मुलं-मुली,महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली जाईल असे देखील प्रचारा दरम्यान पवन भाऊ पारधी बोलले तसेच यांच्या सोबत प्रभागातील व शहरातील युवा वर्गाचा भला मोठा जनसमुदाय सक्रियपणे उभा आहे. प्रभागातील मतदारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते असून त्यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने संवाद साधत घरोगरी भेटी चालू केल्या आहेत.त्यांचे वडील माजी नगरसेवक असून त्यांचे प्रभागातील जनतेशी जिवाभावाचे नाते आहे आणि त्यांचे प्रेम आणि आशीर्वादामुळे पवन भाऊ पारधी या निवडणुकीत विजयी होणार असल्याचे मानले जात आहे. त्यांचा शांत, मनमिळाऊ स्वभाव आणि समाजातील चांगला जनसंपर्क या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. पवन पारधी यांनी प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांच्या विजयाबाबत मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

No comments