एरंडोलला पालिका निवडणुकीच्या रिंगणात नातेवाईक विरोधात तर पती - पत्नी सोबत लढत, काही भागात बंडखोर भारी तर काही ठिकाणी आघाडी भारी. प्रा.सु...
एरंडोलला पालिका निवडणुकीच्या रिंगणात नातेवाईक विरोधात तर पती - पत्नी सोबत लढत,
काही भागात बंडखोर भारी तर काही ठिकाणी आघाडी भारी.
प्रा.सुधीर महाले एरंडोल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल - नगरपालिका निवडणुकीत माघारी नंतर आता प्रत्यक्ष लढती समोर येत आहेत.यात प्रामुख्याने काही जुने चेहरे तर जास्तीत जास्त नविन चेहरे रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.यात काही प्रभागात बंडखोर भारी पडत आहेत तर काही ठिकाणी अपक्ष. काही ठिकाणी मात्र महायुतीचे उमेदवार भारी आहेत तर काही ठिकाणी महाविकास आघाडी विजयी होऊ शकते असे चित्र स्पष्ट आहे.
दरम्यान काही प्रभागात पती - पत्नी निवडणूक लढवत असल्यामुळे नगराध्यक्षपदासह प्रभागातील निवडणुकीची
चुरस वाढली आहे.राजकीय पक्षांचे पदाधिकारी व त्यांच्या परिवारातील सदस्य
निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे राजकीय पक्षांची निवडणुकीत प्रतिष्ठा
पणाला लागली आहे.
नगरपालिका निवडणूक भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून तर राष्ट्रवादी
कॉंग्रेस व शिवसेना ठाकरे गट स्वतंत्रपणे लढत आहेत.प्रभाग क्रमांक सात अ मधून शिवसेनेच्या शारदा अतुल मराठे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नगराध्यक्षपदासाठी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकूर निवडणूक लढत असून त्यांच्या पत्नी तथा माजी उपनगराध्यक्षा डॉ.गितांजली ठाकूर प्रभाक क्रमाक दोन अ मधून निवडणूक लढत आहेत.तसेच राष्ट्रवादी
कॉंग्रेसतर्फे गायत्री दीपक पाटील नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत असून
त्यांचे पती दीपक नामदेव पाटील प्रभाग क्रमांक पाच ब मधून निवडणूक लढत
आहेत.युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील प्रभाक क्रमांक पाच ब मधून तर त्यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक एक अ मधून निवडणूक लढवत आहेत.सावता
माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन प्रभाग क्रमांक सहा अ मधून तर त्यांच्या पत्नी मंगला विजय महाजन प्रभाग क्रमांक चार ब मधून
अपक्ष निवडणूक लढवत आहेत.तसेच दर्शना विजय ठाकूर नगराध्यक्षपदाची निवडणूक अपक्ष तर त्यांच्या नणंद तथा अहिराणी सिने अभिनेत्री पुष्पा ठाकूर प्रभाग
क्रमांक दोन अ मधून महाविकास आघाडी तर्फे शिवसेना उबाठा गटातर्फे निवडणूक लढवत आहेत.
प्रभाग क्रमांक चार अ मध्ये माजी उपनगराध्यक्ष कुणाल रमेश महाजन शिवसेनेतर्फे तर त्यांचे सख्खे चुलत बंधू प्रशांत दिलीप महाजन अपक्ष असे दोन भावांमध्ये
लढत होणार आहे.राजकीय पक्षांचे पदाधिकारी व त्यांच्या परिवारातील सदस्य
पालिका निवडणूक लढवत असल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.माजी
उपनगराध्यक्षा छाया आनंद दाभाडे प्रभाग क्रमांक ३ अ मधून शिवसेनेकडून तर त्यांचे मामे भाऊ अमोल किशोर तांबोळी हे प्रभाग क्रमांक दोन ब मधून अपक्ष निवडणूक लढवित आहेत.नगरसेवक पदासाठी,भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश महाजन यांच्या पत्नी आरती
देवरे भाजपकडून,पौर्णिमा देवरे शिवसेनेकडून,माजी उपनगराध्यक्ष गणेश मराठे
शिवसेना ठाकरे गटाकडून,माजी उपनगराध्यक्षा आरती महाजन अपक्ष,माजी
उपनगराध्यक्ष अभिजित पाटील शिवसेनेकडून प्रभागातील निवडणूक लढवत असल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.प्रभाग क्रमांक एक,तीन,पाच,सात,अकरा मध्ये सरळ लढत होणार असून उर्वरित प्रभागांमध्ये
तिरंगी व चौरंगी लढत होणार आहे.प्रभागात भाजप-शिवसेनेमध्ये काही प्रमाणात बंडखोरी झाली असून बंडखोरांनी अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे आता हे आव्हान राजकीय पक्ष कसे पेलतात हे येणारा काळच ठरवेल.याच बरोबर नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा मोठी चुरस दिसून येत आहे.महायुती व महाविकास आघाडी मध्ये जरी सरळ लढत दिसून येत असली तरी अपक्ष देखील निर्णायक ठरु शकतात असे चित्र दिसत आहे.महायुती तर्फे प्रचार सभा,मेळावे व गृहभेटी करण्यावर भर दिला जात असून महाविकास आघाडी चे उमेदवार सुद्धा गृहभेटी व मेळावे घेऊन प्रचार करीत आहेत.यात अपक्ष उमेदवार देखील मागे नसून त्यांनी देखील जास्तीतजास्त गृहभेटींवर भर दिला आहे.
No comments