adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ संलग्न भारतीय जनता कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य च्या जिल्हाध्यक्ष पदी श्री प्रकाश रमेश पाटील यांची नियुक्ती

भारतीय जनता कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य च्या जिल्हाध्यक्ष पदी श्री प्रकाश रमेश पाटील यांची नियुक्ती   जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत...

भारतीय जनता कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य च्या जिल्हाध्यक्ष पदी श्री प्रकाश रमेश पाटील यांची नियुक्ती  


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ संलग्न भारतीय जनता कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य च्या जिल्हाध्यक्ष पदी श्री प्रकाश रमेश पाटील यांची नियुक्ती याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक 25/11/2025  रोजी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ जळगाव शाखेची प्रथम सभा मा.आमदार संजयजी केनकर प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता कामगार महासंघ महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शना खाली श्री. विजय मोहरकर राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ यांच्या अध्यक्षते मध्ये जळगाव येथे संपन्न झाली त्या वेळी त्यांनी उपस्थित आरोग्य कर्मचारी यांना संघटने ची ध्येय धोरणे व वाटचाल या बद्दल मार्गदर्शन केले व कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेतल्या त्या नंतर सर्वानुमते श्री.प्रकाश रमेश पाटील आरोग्य सेवक प्रा आ केंद्र नशिराबाद यांची जिल्हा अध्यक्ष पदी, श्री. अतुल रामदास माळी यांची जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रदीप सुरेश बोरसे यांची जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली राज्य अध्यक्ष व उपास्थित आरोग्य कर्मचारी यांच्या तर्फे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी अतुल सोनवणे, किशोर माळी, गजानन काकडे, सुनील ढाके, फुगे साहेब, पंकज तायडे, संदीप पाटील, मुकुंद वानखेडे  आरोग्यकर्मचारी उपस्थित होते

No comments