adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई!त्या तिन्ही समाजकंटकांना जिल्ह्यातून ६ महिन्यांची हद्दपारी..शहरात शांततेचा शिलेदार ठरले कोतवाली पोलीस निरीक्षक गायकवाड

 कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई!त्या तिन्ही समाजकंटकांना जिल्ह्यातून ६ महिन्यांची हद्दपारी..शहरात शांततेचा शिलेदार ठरले कोतवाली पोलीस निर...

 कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई!त्या तिन्ही समाजकंटकांना जिल्ह्यातून ६ महिन्यांची हद्दपारी..शहरात शांततेचा शिलेदार ठरले कोतवाली पोलीस निरीक्षक गायकवाड  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२५):-अहिल्यानगर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोतवाली पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तीन कुख्यात समाजकंटकांना तब्बल सहा महिन्यांसाठी जिल्हाबंदी केली आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता भंग होऊ नये व असामाजिक प्रवृत्तीवर लगाम बसावा यासाठी ही कारवाई करण्यात आली. काका उर्फ अब्दुलहक फकीर मोहम्मद कुरेशी (झेंडीगेट), भाईजान ईद्रीस कुरेशी (झेंडीगेट), मम्मी उर्फ संदीप शरद शिंदे (भोसले आखाडा) या तिघांची अहिल्यानगर जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपारी मंजूर झाली.या कारवाईचे सूत्रधार ठरले पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कार्यवाही सजगतेने पार पडली.कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर प्रकारच्या गुन्ह्यांच्या आधारे या तिघांविरोधात जिल्हाबंदीची प्रस्तावना करण्यात आली होती. सदरची कारवाई यशस्वी करण्यासाठी  जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, महिला पोलीस अंमलदार शिल्पा कांबळे,विशाल दळवी,विनोद बोरगे,बाळासाहेब दौंड,वसीम पठाण साबीर शेख,विजय ठोंबरे, सुरज कदम,सत्यम शिंदे,राम हंडाळ,दीपक रोहकले,सचिन लोळगे,रिंकू काजळे,महिला पोलीस अंमलदार शिल्पा ढेरे यांनी केली आहे.

No comments