निवडणुकीच्या तोंडावर अधिकाऱ्यांचे बदली सत्र झाले पुन्हा सुरू... पुरीगोसावी सातारकर सातारा जिल्हा प्रतिनिधी. (संपादक -:- हेमकांत गायकवा...
निवडणुकीच्या तोंडावर अधिकाऱ्यांचे बदली सत्र झाले पुन्हा सुरू... पुरीगोसावी सातारकर
सातारा जिल्हा प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आगामी निवडणुकीच्या तोंडावर पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून. शुक्रवार (ता. 31) शहर पोलीस दल आणि महापालिका सेवेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात मनपात प्रतिनियुक्तीवर असलेले अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची पुन्हा आपल्या मूळ सेवेत म्हणजेच राज्यांच्या वित्त विभागात पाठविण्यात आले आहे. त्यातून अगोदरच 11 दिवसांपूर्वी (ता. 20) शहरांत बदली झालेल्या मोनिका ठाकूर यांचा मार्ग मोकळा झाला. मात्र कार्यक्षम प्रामाणिक अधिकारी अशी प्रतिमा असलेले पोलीस उपायुक्त (परिमंडळ तीन ) बापू बांगर यांच्या बदलीवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सध्या आगामी निवडणुकीसाठी आपल्या मर्जींतील अधिकारी आणण्याचे सत्र सध्या पिंपरी-चिंचवड मध्ये सुरू झाले आहे. त्यात पहिली बदली मनपा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची (7 ऑक्टोबर) रोजी नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून झाली असून. या पदाची अतिरिक्त जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मर्जीतील सनदी अधिकारी श्रावण हर्डीकर यांना देण्यात आले आहे. त्यांनाही फडवणीस यांनी नागपूर मनपातून पुण्यात आणले आहे. दुसऱ्यांदा त्यांना प्रभारी का होईना पुन्हा याच पदावर संधी दिली आहे. प्रदीप जांभळे पाटील यांची बदली झालेल्या दिवशीच शहर पोलीस दलातील डीसीपी बापू बांगर यांची अमरावतीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागांचे ( एसीबी ) अधिक्षक ( एसपी ) म्हणून बदली झाली तर त्या पदावरील मारुती जगताप हे डीसीपी म्हणून शहरांत आली आहेत. त्यांची नियुक्ती बांगर यांच्या जागी (झोनतीन) होती की पुन्हा त्यानिमिंत्त शहर पोलीस दलात छोटीशी खांदेपालट होते याकडे आता लक्ष लागले आहे. मात्र यापुढेही अजूनही बदल्यांचा सिलसिला हळुवार दिसून येणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांचा शोध घेतला जात असून. अशी देखील आता चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.

No comments