adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सातारा डॉक्टर प्रकरणात अचानक मोठा निर्णय, थेट पावरफुल महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची एन्ट्री आता गूढ प्रश्नांची उत्तरं मिळणार...!!

 सातारा डॉक्टर प्रकरणात अचानक मोठा निर्णय, थेट पावरफुल महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची एन्ट्री आता गूढ प्रश्नांची उत्तरं मिळणार...

 सातारा डॉक्टर प्रकरणात अचानक मोठा निर्णय, थेट पावरफुल महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची एन्ट्री आता गूढ प्रश्नांची उत्तरं मिळणार...!!  


सातारा जिल्हा प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सीआयटी स्थापन करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तात्काळ तपास सुरू करण्याच्या आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीला दिले आहेत. तेजस्विनी सातपुते या 2012 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेता या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे देण्यात आल्याची चर्चा आहे. फलटण प्रकरणात अनेक राजकीय नावांचा समावेश असल्याने त्यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली होती. सातारा पोलिसांनी यांची चौकशी केली तर त्यांच्यावर दबाव राहू शकतो. त्यामुळे एसआयटी चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वात तपास करण्यात येणार आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरने 23 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. यावेळी तिने हातावर सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आलं त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप करण्यात आला‌. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही सातारा जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. महिला डॉक्टरने तिच्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याची तक्रार केली होती. पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी खासदारांच्या दोन पीएंनी दबाव टाकल्याचा देखील उल्लेख तिने तक्रारीत केला होता. मात्र तिच्या तक्रारीकडे पोलिसांनी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, त्यामुळेच शेवटी तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. तसेच या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घेतलं अशा अनेक घटना मागे निंबाळकर आणि त्यांच्या लोकांचा हात असल्याचा आरोप करत आमदारांनी काही पुरावेही समोर आणले आहेत. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचा अखेर तपासाची सूत्रे एसआयटीकडे देण्यात आली आहेत.

No comments