adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आधार केंद्रांवर नागरिकांची अफाट गर्दी..!नागरिकांचा उद्रेक, अपडेटसाठी महिलां-विद्यार्थ्यांची सकाळपासून धावपळ”अधिक आधार केंद्रे सुरू करावी नागरिकांची मागणी

 आधार केंद्रांवर नागरिकांची अफाट गर्दी..!नागरिकांचा उद्रेक, अपडेटसाठी महिलां-विद्यार्थ्यांची सकाळपासून धावपळ”अधिक आधार केंद्रे सुरू करावी ना...

 आधार केंद्रांवर नागरिकांची अफाट गर्दी..!नागरिकांचा उद्रेक, अपडेटसाठी महिलां-विद्यार्थ्यांची सकाळपासून धावपळ”अधिक आधार केंद्रे सुरू करावी नागरिकांची मागणी 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२):-शहर आणि परिसरातील आधार केंद्रांवर नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून,महिलां व विद्यार्थ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.आधारकार्ड अपडेट, मोबाईल नंबर लिंक,बोटांचे ठसे व फोटो रेकॉर्डिंग करण्यासाठी आधार केंद्रांवर तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे.प्रत्येक केंद्रावर दिवसभरात केवळ २५ ते ५० नागरिकांचेच अर्ज स्वीकारले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.सकाळपासून उभे असतानाही काम न झाल्याने महिला,वृद्ध,विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षांचे वेळापत्रक सुरू असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.नागरिकांनी प्रशासनाकडे अधिक आधार केंद्रे सुरू करून कार्यक्षम व्यवस्था करावी,अशी मागणी केली आहे.दरम्यान,शनिवार व रविवारी अनेक केंद्रे बंद राहिल्याने गर्दी आणखीनच वाढली आहे. नागरिकांनी “आधार केंद्रांवरील रांग संपणार कधी?” असा सवाल उपस्थित केला आहे.

No comments