प्रकाश विद्यालय व ज्यु कॉलेज मोठे वाघोदे येथे संविधान दिवस साजरा रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्याती...
प्रकाश विद्यालय व ज्यु कॉलेज मोठे वाघोदे येथे संविधान दिवस साजरा
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील प्रकाश विद्यालय व ज्यु कॉलेज मोठे वाघोदे येथे आज संविधान दिवस साजरा करण्यात आला, सर्वप्रथम भारताचे संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांकडून संविधान उद्देश्यीकेचे वाचन करण्यात आले, भारतीय स्वातंत्र्यानंतर संविधान सभेने मसुदा तयार करण्यापासून संविधान अंगीकृत करण्यासंबंधीची माहिती विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती जयश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एस. महाजन पर्यवेक्षक श्री आर. पी. बडगुजर यांनी भूषविले, सूत्रसंचालन श्री बी. टी. सपकाळे यांनी केले तर आभार श्री व्ही. बी. बा-हे यांनी मानले.

No comments