दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या खुर्चीला हार घालून दिव्यांगानी केलं अनोखे आंदोलन. पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत ...
दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या खुर्चीला हार घालून दिव्यांगानी केलं अनोखे आंदोलन.
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त महेश पाटील यांनी अतिरिक्त कारभार स्वीकारल्यानंतर. दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयात येऊन कामकाज सुरू केले नाही. महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव आपल्या कामानिमित्त न्याय मागण्यांनी साठी दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयात पुणे येथे येतात परंतु आठवडा झाला तरी दिव्यांग कल्याण आयुक्त महेश पाटील कार्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे दिव्यांगांची गैरसोय होत आहे. भेटायला येणाऱ्या दिव्यांगाची अवहेलना होत आहे
संतप्त झालेल्या दिव्यांगांनी प्रहार संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव यांचे नेतृत्वाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य आयुक्त साहेब यांच्या खुर्चीला हार घालून हळद कुंकू वाहून खुर्चीची पूजा करत गांधीगिरी पद्धतीने अनोखे आंदोलन केले. व मागणी केली दिव्यांग कल्याण आयुक्त पदावर पूर्ण कार्यकाल पूर्ण करेल असा संवेदनशील प्रामाणिक अधिकारी मिळावा अशी मागणी केली यावेळी अनिता कदम. विष्णू गुंडाळ छाया थिगळे आनंद गायकवाड बापू धुमाळ किशोर मोरे माऊली मेहेत्रे

No comments