शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शाश्वत विकासाची मूल्ये रुजवावीत : आ.अमोल जावळे (शब्बीर खान यावल शहर प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत ...
शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शाश्वत विकासाची मूल्ये रुजवावीत : आ.अमोल जावळे
(शब्बीर खान यावल शहर प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल (दि.२८) : विद्यार्थ्यांनी आपल्या उपजत चौकस बुद्धीने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शाश्वत विकासाची मूल्ये अंगी वाढवावी, त्यातून आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विज्ञान तंत्रज्ञानातील नवनवीन संकल्पनांचा वेध घेणे आणि काहीतरी नवनिर्मिती करणे हाच विज्ञान प्रदर्शनाचा खरा उद्देश आहे, असे प्रतिपादन प्रभात विद्यालय हिंगोणे येथे यावल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी तालुक्याचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी केले.
यावल तालुक्यातील प्रत्येक माध्यमिक विद्यालयातील सहभागी विद्यार्थी तसेच विज्ञान शिक्षकांशी प्रभात विद्यालय येथे याप्रसंगी आमदार जावळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर प्रदर्शनात मांडलेल्या उपकरणांविषयी आस्थेवाईकपणे माहिती करून घेतली तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर सूचना सुद्धा केल्या.
ज्ञानप्रकाश मंडळ संचलित प्रभात विद्यालय हिंगोणे या संस्थेचे चेअरमन रविंद्र हरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विज्ञान प्रदर्शन उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मनोहर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमास तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी, जळगाव पतपेढीचे संचालक अजय पाटील, भरत पाटील तसेच संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती किरण ठाकूर मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नरेंद्र महाले यावल तालुका विज्ञान समन्वयक, मुख्याध्यापक मनोहर गाजरे सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments