adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगावात महात्मा फुले स्मृतिदिनी ‘सत्यशोधक समाज संघ’ दिनदर्शिका-२०२६चे जल्लोषात प्रकाशन

  धरणगावात महात्मा फुले स्मृतिदिनी ‘सत्यशोधक समाज संघ’ दिनदर्शिका-२०२६चे जल्लोषात प्रकाशन  विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ध...

 धरणगावात महात्मा फुले स्मृतिदिनी ‘सत्यशोधक समाज संघ’ दिनदर्शिका-२०२६चे जल्लोषात प्रकाशन 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : समानतेची मशाल पेटवणारे, समाजातील अंधश्रद्धा-दांभिकतेला निरंतर लढा देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पवित्र स्मृतिदिनानिमित्त सकल माळी समाजातर्फे लहान माळी वाडा येथून संत सावतोबा, संत तुकोब्बाराय यांच्या स्मारकास माल्यार्पण करून तात्यासाहेब ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला बैलगाडीवर ठेवून अभिवादन रॅली काढण्यात आली. तात्यासाहेब महात्मा फुले यांच्या स्मारकाजवळ उपस्थितांनी माल्यार्पण केले. समाजएकता आणि वैचारिक जागृतीचे दर्शन घडवणारा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तात्यासाहेब महात्मा फुले स्मारकाजवळ “सत्यशोधक समाज संघ निर्मित दिनदर्शिका-२०२६” चे प्रकाशन विविध समाजातील अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. “जेथे समानता नाही, तेथे मानवता नाही” या फुलेंच्या विचारांना नव्याने उजाळा देत हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती ऐतिहासिक ठरली. 

     प्रास्ताविकात सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक हेमंत माळी यांनी सांगितले की, ही दिनदर्शिका फक्त दिवसांची नोंद नसून बहुजनांचा इतिहास, संत-महापुरुषांचे योगदान, नीतिपाठ, सण-उत्सवांची संस्कृती, नोबेल पुरस्कार विजेत्यांचे जीवन, तसेच सत्यशोधक संघाच्या ऐतिहासिक परिषदांचे दस्तावेजीकरण यांचा अमूल्य वारसा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले की, सत्यशोधक दिनदर्शिका प्रत्येक घरात पोहोचली, तर विचारांचे क्रांतीदीप स्वतःच प्रज्वलित होतील. तद्नंतर प्रचारक पी. डी. पाटील यांनी महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी कार्याचा उल्लेख करताना म्हटले की, धर्मातील दांभिकतेला प्रथम आव्हान देणारे, स्त्री-शूद्र-अतिशूद्र शिक्षणासाठी आयुष्य वेचणारे तात्यासाहेब फुले हे सत्यशोधक चळवळीचे जीवंत प्रेरणास्थान आहेत. ही दिनदर्शिका म्हणजे त्यांच्या कार्याची जिवंत आठवण आणि प्रत्येक कार्यकर्त्याला दिशादर्शक दीपस्तंभ आहे.” प्रकाशनावेळी लक्ष्मण पाटील यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या सत्यशोधक विचारधारेचे समाजजागृतीत असलेले महत्त्व अधोरेखित केले आहे. लक्ष्मण पाटील पुढे म्हणाले की, “फुल्यांच्या विचारांशिवाय सामाजिक परिवर्तन शक्य नाही. न्याय-स्वातंत्र्य-समता-बंधुता यांच्या मूल्यांनी नटलेली ही विचारसमृद्ध व विचार प्रबोधनाची दीपस्तंभ असलेली दिनदर्शिका प्रत्येक घरात असली पाहिजे. असे लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.


▪️धरणगावात विविध समाजांचे उत्स्फूर्त एकत्रीकरण...

        या प्रसंगी धरणगावातील अनेक समाजांचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, एकत्र येऊन समाजबंधुतेचे सुंदर चित्र उभे केले. माल्यार्पण व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा प्रसंगी धरणगाव पोलिस ठाण्याचे पो.नि. सुनील पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम बापू, विठोबा माळी, प्रा बी आर माळी, मोठा माळीवाडा समाजाध्यक्ष विनोद माळी, लहान माळी वाडा रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, पाटील समाजाध्यक्ष भीमराज पाटील, तेली समाजाध्यक्ष सुनील चौधरी, धोबी समाजाध्यक्ष छोटू जाधव, नाभिक समाजाध्यक्ष आनंद फुलपगार, रविंद्र निकम, ब्राम्हण समाजाचे पप्पू भावे, जैन समाजाध्यक्ष राहुल जैन, भाटिया समाजाचे समीर भाटिया, शिंपी समाजाध्यक्ष किरण सोनवणी, चर्मकार संघाचे भानुदास विसावे, बुद्धिष्ट समाजाचे संतोष सोनवणे, मातंग समाजाध्यक्ष रामा चित्ते, एकनाथ चित्ते, मराठे समाजाध्यक्ष भरत मराठे, भोई समाजाध्यक्ष सुनील जावरे, तसेच राजकीय नेते गुलाबराव वाघ, अ‍ॅड. संजय महाजन, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगरसेवक कैलास माळी, भागवत चौधरी, विलास महाजन, दशरथ बापू, एस डब्ल्यू पाटील, शामराव महाजन, मच्छिंद्र पाटील, राजेंद्र महाजन, निंबाजी महाजन, गोपाल महाजन, डीगंबर महाजन, रविंद्र वाघ, विश्वास माळी, आनंद पाटील, ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, ॲड व्ही एस भोलाणे, धर्मराज मोरे, भगीरथ माळी, विनोद रोकडे, योगेश कुंभार, बी आर महाजन, निलेश पवार यांसह माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, माजी नगरसेविका अंजली विसावे, लीलाताई चौधरी, संगीता माळी, वैशाली भावे, पौर्णिमा भाटिया, कविता पाटील, ज्योती माळी, प्रा. के आर महाजन, ललिता वाघ, कल्पना महाजन आदींसह मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला भारदस्त स्वरूप देणारी ठरली. या रॅली व दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या यशस्वितेसाठी भटू महाजन, गोरख देशमुख, निवृत्ती महाजन, गुलाब महाजन, विक्रम पाटील, प्रफुल पवार, राहुल रोकडे, नितेश महाजन, विनायक महाजन, लक्ष्मण माळी, सुनील देशमुख, आकाश बिवाल, दिपक महाजन, धीरज महाजन, नरेंद्र पाटील, रामचंद्र माळी, परमेश्वर महाजन, राजेंद्र वाघ यांसह अनेक सत्यशोधकीय कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. समारोप प्रसंगी अध्यक्ष विनोद माळी यांनी मनोगतातून सांगितले की, समाजातील रुजलेली विषमता मोडण्यासाठी, ज्ञान-अज्ञानाची दरी मिटवण्यासाठी आणि मानवी मूल्यांचे पुनर्स्थापना करण्यासाठी फुले दांपत्याच्या सत्यशोधक विचारांची आज अधिक गरज आहे. सत्य, समता आणि परिवर्तन यांचे तेज "साऊज्योती"च्या कार्यातून आजही प्रकाशमान आहे. ही दिनदर्शिका त्या प्रकाशमान वारशाची स्मृती, प्रेरणा आणि दिशा देणारी आहे. कार्यक्रमाचे आभार समाजाचे सचिव आर डी महाजन यांनी मानले.

No comments