adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धारदार शस्त्रांसह फिरणारा इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळ्यात..

  धारदार शस्त्रांसह फिरणारा इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळ्यात.. कटाला बसवला LCB ने वेळेतच आळा  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत ...

 धारदार शस्त्रांसह फिरणारा इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळ्यात.. कटाला बसवला LCB ने वेळेतच आळा 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि२४):-स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्पर आणि अचूक कारवाईने जामखेड शहरात संभाव्य गंभीर गुन्हा रोखण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश मिळाले आहे.धारदार लोखंडी हत्यारे घेऊन मोटारसायकलवर फिरणाऱ्या एका तरुणाला रंगेहाथ पकडत 32,200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी दिले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी  यांनी पोसई.दिपक मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून आवश्यक सूचना देत कारवाईस रवाना केले.24 नोव्हेंबर रोजी पहाटे जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास बातमी मिळाली की एक इसम जामखेड–बीड रोडवर मोटारसायकलने धारदार हत्यारे घेऊन फिरत आहे.

त्यानंतर हॉटेल रघुनंदन समोर पोलीसांनी सापळा रचला आणि मोटारसायकलवरून येणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले. कैयब शकील पठाण,वय 18 वर्षे, रा. मिलींदनगर, जामखेड असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून 

दोन्ही पंचांच्या उपस्थितीत झडती घेतल्यावर आरोपीकडे धक्कादायक प्रमाणात लोखंडी कोयते,कुऱ्हाड,सुरा,चाकू,१ मोटारसायकल जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 32,200 रु.इतकी आहे.भारतीय हत्यार कायदा कलम 4/25

स्थानिक गुन्हे शाखेचे पोना. (1566) श्यामसुंदर जाधव यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 629/2025 असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी व जप्त वस्तू जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

No comments