adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बाल संस्कार विद्या मंदिर यावल शाळेचे तालुकास्तरी वक्तृत्व स्पर्धेत यश

 बाल संस्कार विद्या मंदिर यावल शाळेचे तालुकास्तरी वक्तृत्व स्पर्धेत यश  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगांव जिल्...

 बाल संस्कार विद्या मंदिर यावल शाळेचे तालुकास्तरी वक्तृत्व स्पर्धेत यश 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगांव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ जळगांव यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम  गटात आपल्या शाळेतील सानवी पंकज गडे - प्रथम, स्वराली सुरेश तायडे - तृतीय बक्षीस मिळविले.

सदर कार्यक्रम प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री धनके साहेब तसेच तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका, सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक  व तज्ञ प्रशिक्षक उपस्थित होते. तालुक्याच्या विविध शाळांच्या स्पर्धकांमध्ये चुरशीने स्पर्धा पार पडली.  माझे उद्याचे स्वप्न हा नियोजित विषय आणि ऐनवेळी चा विषय  याला  60+40  असे गुणदान होते त्यात आपल्या आपल्या बाल संस्कार विद्या मंदिर यावल शाळेतील दोन्ही स्पर्धकांनी परखडपणे भूमिका मांडून प्रथम आणि तृतीय क्रमांकावर स्थान प्राप्त करून बक्षीस मिळवले  तालुका स्तरावरून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला जिल्ह्यात स्तरावर स्पर्धेला जाण्याची संधी मिळाली आहे त्यासाठी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील माळी व सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या

No comments