adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा बँकेवर माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड

 जिल्हा बँकेवर माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर...

 जिल्हा बँकेवर माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि२४):- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड आज पार पडली.दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड प्रक्रिया पार पडली.जरी बँकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असले तरी,घुले यांना अध्यक्षपदी बसवण्यामागे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अध्यक्ष निवडीपूर्वी शहरातील एका हॉटेलमध्ये विखे यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण बैठक झाली.त्यामध्ये घुले यांचे नाव अंतिम करण्यात आल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांनी दिली.फेब्रुवारी २०२६ मध्ये विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत असून,त्यापूर्वी ही निवडणूक ही मोठी राजकीय रणनीती मानली जाते.

No comments